शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"स्पा सेंटर चालवायचे असेल तर दरमहा १५ हजार रुपयांचा हप्ता द्यायचा"; कोरेगाव पार्कमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 12:08 IST

स्पा सेंटरला खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक

पुणे : तुम्हाला स्पा सेंटर चालवायचे असेल तर आम्हाला दरमहा १५ हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल. नाही तर दंडुकीधारी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या तिघांना कोरेगाव पार्कपोलिसांनी सापळा लावून अटक केली.

विशाल कचरु पायाळ (वय २८, रा. कदम वाक वस्ती, लोणी काळभोर), सनी तानाजी ताकपेरे (वय २७, रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशाल पायाळ हा पोलीस प्रवाह न्युजचा पत्रकार असल्याचे सांगत आहे. त्यांचा साथीदार पंकेश राजू जाधव  (वय 35 रा. कोंढवा खुर्द) यालाही अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी मंगेश डोंगरखोस (वय ३१, रा. पिंगळे वस्ती, मुंढवा) यांनी काेरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मंगेश हे कोरेगाव पार्कमधील स्काइन स्पा सेंटर येथे मॅनेजर म्हणून काम पाहतात. स्पा सेंटरच्या मालकीन नुतन धवन (रा. केशवनगर, मुंढवा) या असून १६ जानेवारी रोजी त्यांच्या स्पामध्ये दोघे जण आले व त्यांनी स्काइन स्पा चालू ठेवायचा असेल तर दरमहा १५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल. तेव्हा धवन यांनी त्याला नकार दिला. त्याने माझे परवानगीशिवाय स्पा चालू ठेवता येणार नाही. तुम्हाला दरमहा १५ हजार रुपये द्यावेच लागतील. अन्यथा त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. दंडुकीधारी माणसे पाठवून मारहाण करण्याची धमकी दिली. सोमवारी त्याने फोन करुन आज दुपारी पैसे घेण्यासाठी येतो, असे सांगितले. या प्रकाराची त्यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी तातडीने इतर अधिकारी, पंचांना बोलावून स्काइन स्पा येथे सापळा रचला. विशाल पायाळ व सनी ताकपेरे तेथे आले. मंगेश यांच्याकडून १५ हजार रुपयांचा हप्ता घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सहायक आयुक्त चंद्रकांत सांगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, रुपेश चाळके, दिनेश शिंदे, अमोल सोनावणे, राजेश पवार, निशिकांत सावंत, संदीप गर्जे, गणेश गायकवाड, तुकाराम शिंदे, सचिन वाघमोरे, प्रकाश लंगे यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स :PuneपुणेKoregaon Parkकोरेगाव पार्कPoliceपोलिसArrestअटक