"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 20:55 IST2025-05-05T20:54:54+5:302025-05-05T20:55:12+5:30

Ajit Pawar News: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विविध अफवा उठतील,याला गाळा,याला मातीत घाला,असल्या कंड्या पिकतील.पण माझ्या विचारांच्या लोकांनी गडबड करु नये.वेगळे राजकारण करुन या पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका,असा इशार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

"If you try to undermine the panel by playing different politics, don't come to my door," Ajit Pawar warns. | "वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा

"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा

सणसर - श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विविध अफवा उठतील,याला गाळा,याला मातीत घाला,असल्या कंड्या पिकतील.पण माझ्या विचारांच्या लोकांनी गडबड करु नये.वेगळे राजकारण करुन या पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका,असा इशार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

भवानीनगर येथे कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जय भवानी माता पॅनल प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पवार बोलत होते.पवार पुढे म्हणाले, कारखान्यावर १७३ कोटींचा बोजा आहे.पुढील हंगाम सुरु करण्यासाठी ४६ कोटींची आवश्यकता आहे.त्यासाठी एेच्छीक ठेवी गोळा कराव्या लागतील.शिक्षण संस`था,बापजाद्यांनी उभा केलेलं वैभव अडचणीत आहे.आपण कोणाला कमी लेखत नाही,पण विरोधकांची पार्श्वभुमी बघा,त्यांच्यापैकी कारखान्याला कोण मदत करु शकतं.राज्य सरकारसह केंद्रीय मंत्री अमित शहा यांची आपण वेळप्रसंगी मदत घेवू शकतो.सगंळी सोंग करता येतात,पण पैशांचे साेंग करता येत नाही.कारखान्याला आपल्याला पुर्ववैभव आणण्यासाठी जास्तीत जास्त सर्व घटकांना ,वेगवेगळ्या समाजाला समावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे कोणी रुसु नका,फुगु नका.रुसुन तुमच्या ऊसाचा दर वाढणार नाही.कारखान्याला पुर्वीचे चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही तिन्ही नेते प्रयत्नांची शिकस्त करु.मात्र, त्यासाठी सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवा.उजवा,डावा,जवळचा लांगचा जातीचा,पाहुणा रावळ्याचे राजकारण करु नका.  येणाऱ्या काळात कारखाना सुस्थितीत आणला जाईल, छत्रपती शिक्षण संस्थेला ही आर्थिक मदत करून ही संस्था नावारूपाला आणु, श्री छत्रपती कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये आणला जाईल, असे उपमुख्यमंत्री  पवार यांनी स्पष्ट केले.

यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, निवडणुकीसाठी इच्छुक सर्वच उमेदवार तुल्यबळ होते.मात्र, २१ जणांनाच उमेदवारी देणं शक्य होते. असताना देखील उमेदवारी देता आली नाही..त्यामुळे कोणी गैरसमज करुन घेवू नये,अफवांना बळी पडु नका,असे भरणे म्हणाले.पॅनलप्रमुख पृथवीराज जाचक म्हणाले, कोणाला चेअरमन करण्यासाठी हि निवडणुक नाही.कारखाना निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे होते.पुढील हंगामासाठी कारखान्याचे करार करणे, ओव्हर हॉलिंगची कामे खोळंबले आहेत विरोधकांनी त्याचा विचार करायला पाहिजे होता,असा टोला जाचक यांनी लगावला.यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रशांत काटे यांच्यासह पॅनलचे सर्व उमेदवार, विविध पदाधिकारी उपस`थित होते.आभार अमोल भोइटे यांनी मानले.

१९८४ साली आपण या कारखान्याची निवडणूक लढलो.त्यावेळी मी केवळ ४५ मतांनी निवडून आलो होतो,अशी आठवण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली. आता लाखांच्या फरकाने मी मतदान घेतो.नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यास ते पुढे चांगले काम करतात.यंदा कारखान्याच्या निवडणुकीत भाग घेणार नव्हतो ,पण ही संस्था अडचणीत असताना आपण हितचिंतकांच्या पाठीमागे उभे राहणं गरजेचे असल्याने निवडणुकीत  सहभाग घेतल्याचे उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले.

Web Title: "If you try to undermine the panel by playing different politics, don't come to my door," Ajit Pawar warns.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.