'If you stay here, I will kill you', his brother-in-law threatened to kill him | 'तू इथे राहिलीस तर मारून टाकीन', सावत्र भावानेच दिली जीवे मारण्याची धमकी

'तू इथे राहिलीस तर मारून टाकीन', सावत्र भावानेच दिली जीवे मारण्याची धमकी

ठळक मुद्देमहिलेचा तीस वर्षीय सावत्रभाऊ, त्याची आई व बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी: कौटुंबिक कारणावरून सावत्र बहीण आणि भावामध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर भावानेच गैरवर्तन करून महिलेचा विनयभंग केला. तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. चिखली येथे हा प्रकार घडला. पीडित ३४ वर्षीय महिलेने या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीडित महिलेचा ३० वर्षीय सावत्रभाऊ, त्याची आई व बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा सावत्र भाऊ मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या घरासमोर आला. तुझ्या घराचा दरवाजा उघड, असे म्हणून अश्लील बोलला. तसेच त्याने महिलेच्या घराच्या दरवाजावर दगड फेकून मारला. त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास महिला घरी असताना सावत्र भाऊ त्याची आई व बहीण यांना घेऊन तेथे आला. हिला येथे राहू द्यायचे नाही.  येथून हाकलून द्यायचे, असे म्हणून महिलेला मारहाण केली. तू जर येथे राहिलीस तर तुला जीवे मारून टाकीन, अशी धमकीही त्याने दिली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'If you stay here, I will kill you', his brother-in-law threatened to kill him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.