भिगवण (ता. इंदापूर) :मुलीचा हात धरून ‘तू माझ्याशी लग्न कर’ असे म्हणून लग्न न केल्यास हातातील कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन तरुणांवर भिगवण पोलिस स्टेशनला तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी भादलवाडी (ता. इंदापूर) येथे राहत असलेली २९ वर्षीय तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये आत्याचा मुलगा सचिन कुमार मंचरे (रा. बंडगरवाडी, पोंधवडी, ता. इंदापूर) हा फिर्यादीच्या समोर आला व त्याने ‘तू माझ्याशी लग्न कर’ असे म्हणून फिर्यादीचा हात धरून फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.त्याच्या हातात असलेल्या कोयत्याने फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तरुणीच्या बहिणीच्या पतीने शेतात फिर्यादीचा भाऊ याच्या अंगावर धावून येऊन त्याला धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास भिगवण पोलिस स्टेशनच्या पोलिस हवालदार दीपाली खेत्रे करीत आहेत.
‘तू माझ्याशी लग्न कर नाही तर...’ कोयत्याने जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 17:07 IST