शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

कामे न केल्यास टोल भरणार नाही

By admin | Updated: June 4, 2015 05:31 IST

रखडलेल्या निगडी-देहूरोड दरम्यानच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत झालेल्या बैठकीत नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले.

किवळे : रखडलेल्या निगडी-देहूरोड दरम्यानच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत झालेल्या बैठकीत नागरिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले. आयआरबीने चौपदरीकरण न करता गेल्या वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने टोलवसुली केली आहे, अपघात रोखण्यासाठी आयआरबीने येत्या ४ दिवसांत संरक्षक बाजूपट्ट्यांचे डांबरीकरण करावे, अन्यथा सोमवारपासून सोमाटणे टोलनाक्यावरील टोलवसुली बंद करण्यात येईल, असा इशारा देहूरोड येथे झालेल्या बैठकीत आमदार संजय भेगडे यांनी दिला. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून, त्याबाबत उपाययोजना करण्याबाबत बैठक झाली. या वेळी रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी संजय गांगुर्डे, सल्लागार महेश जगदाळे, आय आयआरबीचे संपर्क अधिकारी मदन गांधी, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे, पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे, बोर्डाचे उपाध्यक्ष ललित बालघरे, सदस्य विशाल खंडेलवाल, माजी उपाध्यक्ष अशोक शेलार, मदनलाल सोनिगरा, यदुनाथ डाखोरे, लहू शेलार, धर्मपाल तंतरपाळे, मिकी कोचर, कैलास पानसरे, बाळासाहेब शेलार, बाळासाहेब जाधव, डॉ. शालक आगरवाल, धनराज शिंदे, सीताराम चौरे आदी उपस्थित होते. आमदार भेगडे म्हणाले, ‘‘निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नसताना आयआरबी कंपनी सोमाटणे येथील नाक्यावर टोलवसुली करीत आहे. याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. चुकीच्या पद्धतीने टोलवसुली होत आहे. या रस्त्यावरील टोल कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.’’ माजी उपाध्यक्ष अशोक शेलार म्हणाले, ‘‘सेवा रस्त्यासाठी जागा उपलब्ध होणार नाही, त्या दृष्टीने उड्डाणपूल उभारताना महामंडळाने दक्षता घेण्याची गरज आहे. रुंदीकरणाचे काम लवकर सुरू करून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करावी. ’’(वार्ताहर)