‘प्रेमसंबंध तोडले तर ठार मारेन, स्वत:लाही संपवेन!’ तरुणाची धमकी

By भाग्यश्री गिलडा | Updated: November 26, 2023 14:18 IST2023-11-26T14:18:00+5:302023-11-26T14:18:56+5:30

धमकी देऊन तरुणीचे अश्लील फोटो मित्रांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर

If you break the love relationship I will kill you too The young man threatened | ‘प्रेमसंबंध तोडले तर ठार मारेन, स्वत:लाही संपवेन!’ तरुणाची धमकी

‘प्रेमसंबंध तोडले तर ठार मारेन, स्वत:लाही संपवेन!’ तरुणाची धमकी

पुणे: प्रेम संबंध ठेव नाहीतर मारून टाकीन अशी धमकी देत तरुणीचे अश्लील फोटो मित्रांना पाठवल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आदेश अनिल बगाडे याच्याविरुद्ध पार्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय महिलेने पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यात म्हटल्यानुसार फिर्यादी महिला आणि आरोपी आदेश बागडे हे २०१६ पासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर त्यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याने तरुणीने त्याचे फोन घेण्याचे बंद केले. त्याचा राग मनात धरून बागडे याने "माझ्यासोबत प्रेमसंबंध चालू ठेव" असे बोलून जीवे ठार मारण्याची आणि स्वतःला संपवण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ त्याच्या मित्रांना पाठवले. याप्रकरणी आदेश बागडे याच्यावर पार्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव या करत आहेत.

Web Title: If you break the love relationship I will kill you too The young man threatened