शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

बारामतीत असं होणार असेल तर उभं न राहिलेलं बरं; अजित पवारांचे विधानसभा न लढविण्याचे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 17:18 IST

कोणीतरी मी सोडून दुसरा आमदार बारामतीला मिळाला पाहिजे, मग तुम्ही १९९१ ते २०२४ पर्यंतच्या माझ्या कामांची त्याच्याशी तुलना करा

बारामती : एवढी कामं करूनही बारामतीत असं होणार असेल तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी. कारण लाखानं निवडून येणारी आपण माणसं. जर बारामतीत असं होणार असेल तर उभं न राहिलेलं बरं, अशा शब्दात विधान सभा निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत.

बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार पुढे म्हणाले,  काम करुनही अशी गंमत होणार असेल तर मग झाकली मूठ सव्वा लाख रुपयांची राहिलेली बरी. मी आता ६५ वर्षांचा झालोय. मी तसा समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. एकदा काय झालं पाहिजे. कोणीतरी मी सोडून दुसरा आमदार बारामतीला मिळाला पाहिजे. मग तुम्ही १९९१ ते २०२४ पर्यंतच्या माझ्या कामांची तुलना करा, असे आवाहन देखील पवार यांनी केले.

पवार म्हणाले, बारामतीकरांच्या नादाला लागायचं काम नाही. बारामतीकरांना शिकवायला जाऊ नका मला उडवून लावलं तर तुमचं काय? असे पवार म्हणाले. पवार साहेबांनी कधी अर्थ खाते स्वतःकडे ठेवलं नाही. त्यांनी मुख्यमंत्रिपदासह अनेक पदं भूषवली. मंत्रिपद माझ्याकडे आल्यानंतर मी अर्थ खातं घेतलं आणि त्यामध्ये निधी कसा आणता येईल याचा विचार केला. अर्थ खात्यावर कुणीतरी काहीतरी बोललं, बोलणाऱ्यांना बोलू द्या तुम्ही त्यात लक्ष घालू नका आम्ही तिकडे बघू, असं अजित पवार म्हणाले.

मला अनेक कामं करायची आहेत. करायचं की नाही करायचं, हे तुमच्या हातात आहे. मी पण माणूस आहे. इतकं करूनदेखील मला हे बघावं लागत असेल, जिथे मी दुसऱ्याला खासदार, आमदार करतो तिथे जर अशी परिस्थिती होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिलेली बरी, असे पवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीचा पराभवाची सल अजुन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात अजुनही असल्याचे या निमित्त्ताने स्पष्ट झाले आहॆ .पवार यांनी विधानसभा निवडणुकीला न उभे राहण्याचे संकेत दिले.यावेळी कार्यकर्ते यांनी गोंधळ केला.दादा तुम्ही स्वतः उभे राहा,दादा काहीही करा पण तुम्हीच उभा राहा कार्यकर्त्यांचा सल्ला,अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

मागील आठवड्यात खासदार  सुनील तटकरे बारामतीत आले होते. ते म्हणाले, बारामतीचे तुम्ही हे काय केले आहे? काम केलं तरी असं कसं होतं? मी म्हणालो, मला माहिती नाही, काम करायचं आपल्या हातात आहे.निवडून द्यायचं  लोकांच्या हातात,असे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणMahayutiमहायुतीBaramatiबारामती