शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

चुकले असतील तर संजय राठोडांवर कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:11 IST

पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत काही कमी-जास्त घडले असेल तर त्याची सखोल चौकशी व्हावी. त्या चौकशीला कोणाचाही ...

पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत काही कमी-जास्त घडले असेल तर त्याची सखोल चौकशी व्हावी. त्या चौकशीला कोणाचाही विरोध असता कामा नये. राठोड जर चुकले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली आहे.

शुक्रवारी (दि.२६) ते पत्रकार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.

शेट्टी म्हणाले की, हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. येथे स्त्रियांचा सन्मान झालाच पाहिजे. पूर्वीच्या सरकारच्या काळातील मंत्र्यांवर असेच आरोप झाले होते. आत्ता राजीनामा मागणाऱ्यांची तेव्हा काय भूमिका होती, याही प्रश्नाचे उत्तर द्यावे.

शेतकरी आंदोलन आणि अदानी-अंबानी या उद्योगपतींबद्दल बोलताना शेट्टी म्हणाले की, तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. केंद्र सरकारला यावर मार्ग काढणे नामुष्कीजनक वाटत असावे. आतापर्यंत अडीचशे शेतकऱ्यांनी जीव गमावला आहे. सरकारने लादलेले तीन कृषी कायदे सामान्य माणसावरही परिणाम करणारे ठरणार आहेत.

शेतकरी लुटला जाऊ नये, या भूमिकेतून बळीराजा आंदोलन करतोय. यात पुढे आलेले दोन नामधारक म्हणजेच अदानी-अंबानी होय. यापैकी अंबानीच्या घरासमोर स्फोटके सापडतात. म्हणजे नेमके हे घडवून आणले आहे का? त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी घडवलेले हे षडयंत्र असल्याचे माझे ठाम मत आहे. ही स्फोटके मुंबईत येत असताना गुप्तचर यंत्रणा, पोलीस, रॉ काय करत होती. मग आमची मुंबई सुरक्षित नाही का? सीबीआयने बाकी राजकीय कामांपेक्षा याकडे लक्ष द्यावे. अशी स्फोटके घराजवळ आणून अंबानींना सहानुभूती मिळेल असे त्यांनी अजिबात समजू नये, असे शेट्टी म्हणाले.