शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

PMC: "नागरिकांना भेटायला वेळ नसेल तर आयुक्त काय कामाचे?" नागरिकांचे 'जवाब दो आंदोलन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 17:56 IST

पुणेकरांच्या समस्या सोडविणार कोण?...

पुणे : रस्त्यात खड्डे असल्याने पुणेकर त्रस्त आहेत, स्मार्ट सिटी म्हटलेल्या औंध, बाणेर, पाषाण भागात पाणी टंचाई आहे, अशा अनेक समस्या असताना दुसरीकडे पालिका आयुक्त नदी काठ सुंदर करण्यावर कोट्यवधी रूपये खर्च करत आहेत. याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी नागरिकांनी पालिकेसमोर जवाब दो आंदोलन केले. विविध समस्यांचे फलक यावेळी हातात घेऊन पुणेकर सहभागी झाले होते. परंतु आयुक्त विक्रम कुमार मात्र कोणालाही भेटले नाहीत. सामान्य नागरिकांना जर आयुक्त भेटत नसतील तर अशा आयुक्तांची पुण्याला गरज नाही, असा तीव्र संताप नागरिकांनी व्यक्त केला. दुपारी तीन वाजेपर्यंत नागरिकांना ताटकळत ठेवण्यात आले होते. 

आज सकाळपासून पालिकेसमोर नागरिकांनी जमायला सुरुवात केली आणि आयुक्त तुम्ही समोर या, अशा घोषणा दिल्या. लोकांची गर्दी पाहता ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. नागरिकांना पालिकेत सोडले जात नव्हते. पण नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केल्यावर ते आत गेले. पुणे रिव्हर रिव्हायवल आणि नदीप्रेमी, नागरिक आदींनी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी पुणे पालिकेसमोर ऑगस्ट क्रांतीदिनाच्या मुहूर्तावराज सकाळी १० वाजता चलो पीएमसी असे आंदोलन केले. या नागरी चळवळीत सहभागी होऊन सुंदर व स्वच्छ पुणे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्व पुणेकर नागरिककांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

नागरिकांना आयुक्तांना भेटायचे होते, पण ते भेटले नाहीत. त्यामुळे त्यांच्या केबिनमध्ये जाऊन निवेदन ठेवण्यात आले. नागरिकांनी खालील समस्या मांडल्या आहेत. तुम्हाला देखील त्या भेडसावत असतील तर या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. 

तुम्ही टँकरद्वारा पाणी विकत घेता का? नदी किंवा सखल भागात येणाऱ्या पुरामुळे तुम्ही व तुमचे शेजारी बाधित होता का? भविष्यात येऊ घातलेल्या तीव्र हवामान बदलांबाबत तुम्हाला चिंता वाटते का?  तुमची मुले आरोग्यपूर्ण असावीत याबद्दल तुम्हांस काय वाटते? स्वछ सुंदर नैसर्गिक अशी आपली नदी असावी असे तुम्हांस वाटते का?  नदीमधील जलचरांच्या जगण्याच्या अधिकाराबद्दल आपण काय म्हणाल? ज्या नदीचे पाणी आपण पितो तिचा आपल्याकडून होणाऱ्या अनादराची तुम्हाला चिंता वाटते का? आपणा करदात्यांच्या पैशाचा पुणे मनपाकडून होणाऱ्या वापराविषयी तुम्ही चिंतीत आहात का? वरीलपैकी एकापेक्षा अधिक बाबींवर जर तुम्ही खूणा करत असाल तर तुम्ही पुणे रिव्हर रिव्हायवल या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे आणि पालिकेविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाagitationआंदोलन