पाणी दिल नाही तर पालखी अडवणार : पुण्यातल्या नगरसेविकेचा पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 14:15 IST2018-07-06T14:10:56+5:302018-07-06T14:15:26+5:30
महापालिकेने कळस धानोरी भागाला नियमित पाणीपुरवठा नाही तर उद्या पुण्यात येणारी पालखी अडवणार असल्याचा पवित्रा पुणे महापालिकेच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांनी यांनी घेतला आहे.

पाणी दिल नाही तर पालखी अडवणार : पुण्यातल्या नगरसेविकेचा पवित्रा
पुणे :महापालिकेने कळस धानोरी भागाला नियमित पाणीपुरवठा नाही तर उद्या पुण्यात येणारी पालखी अडवणार असल्याचा पवित्रा पुणे महापालिकेच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांनी यांनी घेतला आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही या भागाला पाणीपुरवठा होत नसल्याने विश्रांतवाडीतील मुकुंदनगर, आंबेडकर नगर भागात आंदोलन केले जाणार आहे.या आंदोलनाच्यावेळी महापालिका प्रशासनाच्या निषेदार्थ पालखी अडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या भागातून पुणे शहरात प्रवेश करते.
होळकर पम्पिंग स्टेशन ते विद्यानगर पम्पिंग स्टेशन दरम्यान अनेक महिन्यांपासून कमी दाबाने आणि अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी महापालिका प्रशासनाला टिंगरे यांनी अनेकदा पत्रही दिले आहे. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसून नागरिकांना रोजच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी हा पवित्रा घेतल्याचे सांगितले.