मालकाची ओळख सांगून सव्वा लाख लांबविले

By Admin | Updated: December 12, 2014 00:09 IST2014-12-12T00:09:55+5:302014-12-12T00:09:55+5:30

बॅंकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्यांना ओळख सांगून त्यांचे पैसे लंपास करण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.

By identifying the owner's identity, it is worth a hundred million | मालकाची ओळख सांगून सव्वा लाख लांबविले

मालकाची ओळख सांगून सव्वा लाख लांबविले

पुणो : बॅंकेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्यांना ओळख सांगून त्यांचे पैसे लंपास करण्यात आल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी विश्रमबाग आणि लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरटय़ांनी एकूण एक लाख 35 हजारांची रक्कम चोरून नेली.
विश्रमबाग पोलीस ठाण्यामध्ये जमादार वर्मा (वय 42, रा. सदाशिव पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. वर्मा एका खासगी शिकवणीमध्ये नोकरीस आहेत. त्यांच्या मालकाने बॅंकेत भरणा करण्यासाठी दिलेले 2क् हजार रुपये घेऊन ते नवी पेठेतील एका बॅंकेमध्ये गेले होते. रांगेत उभे असताना त्यांना एका व्यक्तीने नावाने हाक मारून बाजूला बोलावून घेतले. मालकाला एक लाख रुपये द्यायचे आहेत, असे सांगून त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. गप्पा मारत त्यांना शेजारच्या इमारतीमध्ये नेऊन त्यांचे 2क् हजार रुपये घेऊन चोरटा पसार झाला.
(प्रतिनिधी)
 
लष्कर परिसरातील देना बॅंकेत पैसे भरायला गेलेल्या गौतम भोसले (वय 4क्, भवानी पेठ) यांना भेटलेल्या एकाने  ‘तुङया मालकाला चेक दे’ असे सांगितले. गणोश नावाच्या व्यक्तीची ओळख करुन देत हा पैसे भरेल तू माङयासोबत चल, असे त्यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी एक लाख पंधरा हजार रुपये गणोशकडे दिले. त्यांना बाहेर घेऊन गेल्यानंतर आरोपीने आपले दुकान कॅनरा बॅंकेसमोर असून, राज एंटरप्रायङोस असे दुकानाचे नाव असल्याचे सांगत फसवणूक केली.

 

Web Title: By identifying the owner's identity, it is worth a hundred million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.