Pune Crime: इन्स्टाग्रामवर ओळख झाली, धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकाला अटक
By भाग्यश्री गिलडा | Updated: May 31, 2024 16:05 IST2024-05-31T16:05:06+5:302024-05-31T16:05:42+5:30
पुणे : इंस्टाग्राम या सोशल मीडियावरील ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या केल्याची घटना सिंहगड परिसरात घडली आहे. त्यानुसार दत्तात्रय बाबुराव ...

Pune Crime: इन्स्टाग्रामवर ओळख झाली, धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकाला अटक
पुणे : इंस्टाग्राम या सोशल मीडियावरील ओळखीतून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या केल्याची घटना सिंहगड परिसरात घडली आहे. त्यानुसार दत्तात्रय बाबुराव शिंदे (वय- २२ रा. तुकाईनगर, वडगाव) याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडीत मुलीची फेब्रुवारी २०२३ मध्ये इंन्स्टाग्रामवर ओळख झाली. शिंदे याने वडगाव परिसरात राहणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत इंन्स्टाग्रामवर ओळख केली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिला धमकी देऊन लगट केले. मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊ घरी येऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक सबंध ठेवले. तसेच तिला धमकी देऊन सिहंगड किल्ला परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. पिडीत मुलीने त्याला नकार दिला असता आरोपीने तिला मारहाण करुन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करत आहेत.