शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

धर्मादाय कार्यालयाकडून मदतीचा आदर्श पॅटर्न

By admin | Updated: May 19, 2015 01:06 IST

धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने अनाथ, मतिमंद, गरीब मुलांच्या संगोपनासाठी काम करणाऱ्या ३ संस्थांना ३० लाखांची मदत मिळवून दिली आहे.

पुणे : धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने अनाथ, मतिमंद, गरीब मुलांच्या संगोपनासाठी काम करणाऱ्या ३ संस्थांना ३० लाखांची मदत मिळवून दिली आहे. न्यासाकडे जमा झालेला पैसा पडून न राहता तो गरजू संस्थांपर्यंत पोहोचविण्याचा आदर्श पॅटर्न धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी घालून दिला आहे.अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या खर्चासाठी दारोदार भटकावे लागत असताना धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने स्वत:हून लाखो रुपयांची देणगी दिल्याने संस्थाचालकांना सुखद धक्का बसला आहे. ‘लोकमत’मधील एका लेखामध्ये अमरावती येथील मतिमंद मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेची माहिती आली होती. त्याआधारे माहिती घेऊन या संस्थेस ५ लाख, सातारा येथील एहसास मंतिमंद मुलांचे बालगृह या संस्थेस २० लाख व म्हसवडच्या द्रोणागिरी शिक्षण संस्थेस ५ लाख अशी ३० लाखांची महत्त्वपूर्ण मदत करण्यात आली आहे.कराड येथील मारुती देव ट्रस्ट या ट्रस्टला मंदिराच्या जीणोद्धारासाठी पैशांची आवश्यकता होती, त्यांच्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने त्यांनी जमिनीची विक्री करण्याचा प्रस्ताव पुण्याच्या सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला होता. या संस्थेला किती रकमेची आवश्यकता आहे याची माहिती सहधर्मादाय आयुक्तांनी घेतली. त्यानुसार ७५ लाख रुपयांची गरज असल्याचे मारुती देव ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन या जमिनीची विक्री केली असता ट्रस्टच्या जमीन विक्रीतून १ कोटी ५ लाख रुपयांची रक्कम मिळाली. ट्रस्टच्या आवश्यकतेनुसार त्यांना ७५ लाख रुपये देण्यात आले. उर्वरित ३० लाख रुपयांची रक्कम ही धर्मादाय न्यासाच्या बँक खात्यात पडून राहिली असती. मात्र या रकमेचा सामाजिक कार्यासाठी सदुपयोग व्हावा याकरिता शिवकुमार डिगे यांनी पुढाकार घेतला. अनाथ, मतिमंद मुलांच्या संगोपनाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, त्यांच्या संगोपनासाठी मोठा खर्च येत असताना त्यांना मिळणारी मदत तोकडी पडत असल्याची माहिती डिगे यांना मिळाली होती. ‘लोकमत’मधील एका लेखामध्ये अमरावती येथील परतवाडाच्या गोपाला शिक्षण संस्थेची व त्यांच्या कामाची माहिती आली होती. त्याची खातरजमा करून या संस्थेला ५ लाखांचा धनादेश देण्यात आला. सातारा येथील एहसास संस्थेच्या कामाची त्यांनी माहिती घेतली. संस्थेच्या उभारणीकरिता त्यांना पैशांची मोठी गरज असल्याने त्यांना २० लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला. तसेच सातारा येथील द्रोणगिरी संस्थेस ५ लाखांची मदत त्यांनी केली. पडून राहण्यापेक्षा गरजंूना मदत‘‘मंतिमंद, बेवारस व दुर्लक्षित मुलांसाठी तिन्ही संस्था काम करीत आहेत, या संस्था कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय चालविल्या जात आहेत. न्यासास मिळणारा पैसा हा सामाजिक कामासाठी वापरला जावा, ज्या संस्था समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करतात अशा संस्थांना आर्थिक मदत करून त्यांना त्यांच्या कामाबाबत प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. ही रक्कम न्यासाच्या बँक खात्यामध्ये पडून राहिली असती. परंतु, या रकमेचे वाटप झाल्यामुळे मुलांच्या संगोपनासाठी ती उपयोगी पडणार आहे. न्यासाच्या रकमेचा यापेक्षा चांगला वापर झाला असता असे मला वाटत नाही,’’ असे धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिलेल्या निकालपत्रामध्ये नमूद केले आहे.