शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

"राज ठाकरे म्हणजे विचारांचा अथांग महासागर, मी राजमार्गावरच राहणार"; वसंत मोरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 4:34 PM

पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आंदोलनांत सहभागी नसल्याने विविध चर्चाना उधाण आले होते

पुणे : राज ठाकरेंनी पुकारलेल्या भोंग्यांच्या आंदोलनात कट्टर समर्थक आणि पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आंदोलनांत सहभागी नसल्याने विविध चर्चाना उधाण आले होते. त्यावेळी मी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी बालाजी दर्शनाला गेलो होतो. अक्षय्य तृतीयेनिमित्ताने हे नियोजन केले होते. त्यामुळे मला आंदोलनात सहभागी होता आले नाही. परंतु माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते. एखादा सैनिक नसेल तर लढाई हरत नाहीत. त्यामुळे जर माझ्या नसल्याने विविध चर्चा होत असतील. तरी मी अजूनही राजमार्गावरच आहे आणि राजमार्गावरच राहणार मतभेद असले तरी मनभेद नाहीत तेव्हा वसंत मोरे यांनी स्पष्ट केले होते. 

आज सकाळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांची भेट घेतली. यावेळी वसंत मोरे आणि मनसेचे शिष्टमंडळ वेगळे असल्याचे दिसून आले. याबाबत मोरे यांना विचारले असता त्यानी 'एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे. राज ठाकरे विचारांचा अथांग महासागर आहे, त्याला अनेक नद्या नाले मिळतात. सगळे खळखळणारे आहेत. त्यापैकी मी एक खळखळणारा आहे. त्यामुळं माझा मार्ग राजमार्ग असल्याचे त्यांनी सांगितले आहे.' मोरे म्हणाले,  एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे. तसेच माझ्याकडे शहराची जबाबदारी नसली तरी माझ्याकडे तीन प्रभागांची जबाबदारी दिली. तर त्यातून मी ५ नगरसेवक निवडून आणू शकतो. वसंत मोरे यांना एकला चलो रे या भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरे विचारांचा अथांग महासागर आहे, त्याला अनेक नद्या नाले मिळतात. सगळे खळखळणारे आहेत. त्यापैकी मी एक खळखळणारा आहे. माझी वाट नेहमी वेगळीच असते. माझं ध्येय धोरण असत, पक्ष वाढवणे, जास्तीत जास्त जाग निवडून आणणे हे आहे. शहराची जबाबदारी अध्यक्षांची आहे. त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही.  माझं २५ नगरसेवकांचे टार्गेट होते. माझ्या भागातील नगरसेवक कसे वाढतील याकडे लक्ष देतोय. माझा मार्ग राजमार्ग आहे.    

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणSocialसामाजिक