'मी उडी मारून आत्महत्या करेल...' अपंग तरूण चढला मोबाईल टॉवरवर; खेड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 18:07 IST2022-08-29T17:53:30+5:302022-08-29T18:07:53+5:30
खेड तालुक्यातील वाकी बुद्रुकला राहत्या घराची नोंद ग्रामपंचायत करित नसल्याने अंपग तरुण मोबाईल टॉवरवर चढला

'मी उडी मारून आत्महत्या करेल...' अपंग तरूण चढला मोबाईल टॉवरवर; खेड तालुक्यातील घटना
राजगुरुनगर : वाकी बुद्रुक (ता खेड )राहत्या घराची नोंद ग्रामपंचायत करित नसल्याने अंपग तरुण मोबाईल टॉवरवर चढला आहे. सुमारे एक तास टॉवरवर बसून होता. अखेर पोलिसांनी विनवणी करून घराची नोंद करु असे सांगितल्यावर हा तरुण टॉवर वरून खाली उतरला.
वाकी येथील जीवन बळवंत टोपे (वय ३२ ) हा अपंग तरुणाची ग्रामपंचायत मध्ये राहत्या घराची नोंद करण्यात येत नव्हती. अनेक वेळा हेलपाटे या तरुणाने घातले. अखेर घराची नोंद होत नसल्याने वैतागुन आज. दि२९ दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत शेजारी असणाऱ्या मोबाईल टॉवरवर चढला. माझ्या घराची नोंद करा नाही तर मी टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करेल. असे वरून सांगत होता. घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी झाली होते. अंपग तरुणाच्या घरातील सदस्य मोठमोठयाने रडत होते.अखेर चाकण पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर पोलिसांनी या तरुणाची विनवणी केली. घराची नोंद करू टॉवरवरून खाली येऊन चर्चा करू असे सांगितल्यानंतर तरुण टॉवरवरून खाली उतरला.