'मला दुसरं लग्न करायचंय तू निघून जा', पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By नम्रता फडणीस | Updated: August 12, 2022 16:17 IST2022-08-12T16:17:25+5:302022-08-12T16:17:34+5:30
समाधान मारुती गायकवाड (रा. केशवनगर, मुंढवा, मुळ बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

'मला दुसरं लग्न करायचंय तू निघून जा', पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पुणे : मला दुसरे लग्न करायचे असल्याचे सांगून तू माझ्या आयुष्यातून निघून जा नाही तर मी तुला मारुन टाकीन असे सातत्याने बोलत दुसरे लग्न करण्यासाठी पतीकडून होणा-या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दीपाली समाधान गायकवाड (वय ३०, रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी जयश्री दुर्योधन सोनवते (वय ४८, रा. राहुलनगर, निगडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समाधान मारुती गायकवाड (रा. केशवनगर, मुंढवा, मुळ बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मुंढव्यातील केशवनगर येथे गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली व समाधान गायकवाड यांचा विवाह झाला होता. दोन वर्षापासून पती हा मला दुसरे लग्न करायचे सांगत तिला शिवीगाळ करुन वारंवार मारहाण करीत असे. या छळाला कंटाळून दीपाली हिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी समाधान गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक बिनवडे तपास करीत आहेत.