... तर माझं लग्नही झालं असतं, पार्थ पवारांचं 4 मनिटांच दुसर भाषण दमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 08:40 PM2019-03-23T20:40:32+5:302019-03-23T20:42:51+5:30

'शांतता, सुरू करू ?...  नमस्कार मंडळी, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. सर्वांना माझा नमस्कार. पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीनं आपण काम केलंय.

... I too would have been married, Partha Pawar's 4 minutes second speech strong in pune | ... तर माझं लग्नही झालं असतं, पार्थ पवारांचं 4 मनिटांच दुसर भाषण दमदार

... तर माझं लग्नही झालं असतं, पार्थ पवारांचं 4 मनिटांच दुसर भाषण दमदार

googlenewsNext

पुणे - अजित पवार यांचे पुत्र आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणाची सोशल मीडियातून खिल्ली उडविण्यात आली. मात्र, मतदारसंघातील प्रचारावेळी दुसरं भाषण करताना पार्थ पवार यांच्यात आत्मविश्वास जाणवला. हातात कुठलिही चिठ्ठी न घेता पार्थ यांनी थेट माईक घेतला. त्यानंतर छोटेखानी पण आत्मविश्वासपूर्ण भाषण पार्थ यांनी केलं. यावेळी बोलताना, मी उगीचच मुंबईला गेलो, अगोदरपासूनच इथ यायला पाहिजे होते. मग, माझं लग्नही झालं असतं, असे पार्थ पवार यांनी म्हटले. 

'शांतता, सुरू करू ?...  नमस्कार मंडळी, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. सर्वांना माझा नमस्कार. पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीनं आपण काम केलंय. आजही माझा मित्र माझ्यासोबत फिरत होता, तोही मला म्हणाला आपण कुठं आलोय. म्हणजे, आपण जे काम केलंय ते लोकांपर्यंत का मांडलं नाही. म्हणजे, आपण पिंपरी चिंचवडमध्ये जे केलंय ते महाराष्ट्रभर का मांडल नाही. मोदी गुजरात भारतभर मांडू शकतो, तर आपण पिंपरी चिंचवड महाराष्ट्रभर का मांडू शकत नाहीत तेच मला कळत नाही. आम्ही गेल्या 10 दिवसांत लोकांनी मला एवढं प्रेम दिलंय हे पाहून वाटतंय, मलाच पार्थ पवार प्रेम झालंय की पार्थवर प्रेम झालंय.'' कदाचित मी, सपोज 18 वर्षांचा असताना इथं काम सुरू केलं असतं तर लग्नही झालं असतं माझं. उगाचच मी मुंबईत वेळ घालवला, असे म्हणत आपल्या उमेदवारीला किंवा मतदारसंघात नेतृत्वाची जबाबदारी स्विकारण्यास उशीर केल्याची खंत पार्थ पवार यांनी बोलून दाखवली. पार्थ यांच्या दुसऱ्या भाषणावेळी उपस्थितांना टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहनही दिलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पिंपरी चिंचवड येथे पार्थ यांनी हे भाषण केलं

आता, आपल्याकडे 35 दिवस राहिलेत, आता सर्वांना एकत्र मिळून काम करायचंय. एक जो वर्ग आहे तो म्हणजे तरुणांचा. माझी प्रगती आपली प्रगती असं समजून सर्वांनी काम करुया, आपल्याला आजोबांना पंतप्रधान बनवायचंय हेच आपलं येम आहे, असे म्हणत पार्थ यांनी 4 मनिटांचे आत्मविश्वापूर्ण भाषण केलं. पार्थ पवार यांच्या पहिल्या 3 मिनिटांच्या भाषणावरुन त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर, अनेकांनी पार्थ यांच्या घराणेशाहीवरही बोट ठेवले होते. मात्र, राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या भाषणाचे समर्थन केले होते. तसेच पार्थ यांच्यावर टीका करणाऱ्या नेटीझन्सचा नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला होता. "पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणवार खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. पहिले भाषण आणि मोठी गर्दी.. धाडस लागते! लंबे रेस का घोडा है.. याद रखना!!" असं ट्वीट नितेश राणेंनी केलं होतं. तर, पंकजा मुंडेंनीही पार्थचे स्वागत, तो पुढे चागंलं बोलेल असं बोलून दाखवल होतं.  

दरम्यान, अवघ्या तीन मिनिटांच्या भाषणात पार्थ पवार बरेच गोंधळलेले दिसले. अनेकवेळा ते गडबडलेही. त्यानंतर, सोशल मीडियावर पार्थ यांच्या भाषणाची चांगलीच खिल्ली उडविण्यात आली. तर, अनेकांनी लोकसभा उमेदवार असलेल्या पार्थ यांच्या भाषणावरुन त्यांना लक्ष्य केलं. कागदावर लिहून आणलेले भाषण पार्थ पवार यांनी वाचून दाखविले. मात्र, भाषणात अनेकवेळा ते गोंधळून गेले त्याची चर्चा सोशल मिडीयात होऊ लागली. पार्थ पवार यांनी भाषणाची सुरुवात करतानाच माझं हे पहिलं भाषण आहे, काही चूकभूल झाली तर माफ करा, अशी आर्जवही केली. या मेळाव्यातील अडखळलेल्या भाषणात पार्थ म्हणाले, राजकारणात जरी नवीन असलो तरी तुम्ही विश्वास दाखवा तो मी सार्थ करुन दाखवेन. तसेच या मतदार संघाला बारामती व पिपंरी चिंचवडसारखे विकसित करेन, असेही पार्थ यांनी म्हटले होते. तसेच मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो, असेही पार्थ म्हणाले होते. 

Web Title: ... I too would have been married, Partha Pawar's 4 minutes second speech strong in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.