शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

"मी प्रपोज केला पण.." ; तरुणाच्या भन्नाट प्रश्नावर पुणे पोलीस आयुक्तांचे 'खास' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 17:53 IST

सर..मला आवडणारी मुलगी कालच बालाजीनगरला राहायला आली आहे. मी तिला प्रपोजही केले...

पुणे: सर..मला आवडणारी मुलगी कालच बालाजीनगरला राहायला आली आहे. मी तिला प्रपोजही केले. परंतु, ते नाकारून तिने आपण फक्त मित्रच आहोत असे सांगितले. प्लिज सर..तुम्ही काहीतरी करून द्या, असा प्रश्न थेट पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना ट्विटरवर विचारला. अन् त्या तरुणाला पोलीस आयुक्तांनी जे उत्तर दिलं ते अफलातून होते. 

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरवरून पुणेकरांशी सोमवारी( दि. ८) संवाद साधला. यावेळी वाहतूक, मास्क, पोलिसांची वागणूक, महिला सुरक्षा, नियम याबाबत नागरिकांनी प्रश्न विचारलेल्या प्रश्नांवर गुप्ता यांनी दिलखुलास उत्तरे दिली.याचवेळी लोकांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातीलही प्रश्न त्यांना विचारले. पण त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सामान्य माणसासारखी उत्तरे दिली. 

एका तरुणाने पुणे पोलिस आयुक्तांना थेट त्याच्या प्रेमातील अडचण सांगत त्यातून काहीतरी मार्ग काढून द्या असे सुचवले. आयुक्तांनी पण त्याला आपल्या खास शैलीत उत्तर देत आधारही दिला आणि मार्गदर्शन केले.

तरुणाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त गुप्ता म्हणाले, त्या मुलीची इच्छा नसेल तर तू काहीच करू नकोस. आम्हीही काही करणार नाही. पण आमच्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबतच आहे. 

मास्क आणि हेल्मेटबाबत नागरिकांचे अनेक प्रश्न आता कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आम्ही मास्क घालू का, चारचाकी मध्ये अनिवार्य आहे का, अजून किती दिवस मास्क घालावे लागेल. असे अनेक प्रश्न नागरिकांनी विचारले. यावर उत्तर देताना अमिताभ गुप्ता म्हणाले, आम्ही सर्व पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठीच असतो. सद्यस्थितीत नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहणे फारच महत्वाचे आहे. मास्क घातल्याने तुम्ही कोरोना आजारापासून दूर राहू शकता. दंड आकारण्यापेक्षा तुमची आरोग्य आणि सुरक्षा माझ्या दृष्टीने महत्वाची आहे. तरुण हे भारताचे भविष्य आहेत. त्यांनी तर मास्क घालणे अनिवार्य आहे. तरुणांकडून नियमांचे पालन होत नसेल. तर ती अत्यंत निराशाजनक बाब आहे. हेल्मेटसक्ती नसूनही हेल्मेट घालणे योग्य आहे का असे नागरिकांनी विचारल्यावर आयुक्त म्हणाले, हेल्मेटची निवड सुरक्षेसाठी करा. त्याची आवड म्हणून करू नका. 

शाळा, महाविद्यालयात गुन्हेगारी वाढत आहे याबाबत बोलताना आयुक्त म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी वाढण्याची जबाबदारी सोशल मीडिया आणि आजूबाजूचे वातावरणच कारणीभूत आहे. त्यासाठी आई वडिलांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. 

स्त्रियांना सुरक्षेसाठी पोलीस नेहमीच सतर्क राहणार आहेत. त्यांना रात्री - अपरात्री कधीही मदत लागल्यास पोलीस स्त्रियांना पहिले प्राधान्य देतील. त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्तrelationshipरिलेशनशिपTwitterट्विटर