"तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचंय" असे सांगून तरुणीला दिला त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 18:47 IST2021-04-14T18:46:45+5:302021-04-14T18:47:25+5:30
विनयभंग केल्या प्रकरणी तरुणाला अटक

"तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचंय" असे सांगून तरुणीला दिला त्रास
पिंपरी: तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून तरुणीला सातत्याने फोन केला. तसेच तरुणीचा व स्वतःचा फोटो इन्स्टाग्रामच्या डीपीवर ठेवला. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुळशी तालुक्यातील सूसगाव येथे २०१७-१८ ते १३ मार्च २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
सुरज हरिशचंद्र पडवळ (वय २६, रा. बावधन), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १३) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण आणि तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तरुणाचे लग्न झाले असून त्याने तरुणीच्या आईच्या मोबाईलवर इच्छा नसतानाही वेळोवेळी फोन करून संपर्क केला. तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणाला. तसेच तरुणीसोबत स्वतःचा फोटो परस्पर इंस्टाग्रामच्या डीपीवर ठेवला. तरुणीच्या विरुद्ध त्यांच्यावर पाळत ठेवली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.