शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मी माझ्या बायकोचा खून केला; पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात, शिरूर तालुक्यातील भयानक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 20:49 IST

मी माझ्या बायकोचा खून केला असल्याचे पतीने पोलिसांना सांगितल्यावर ते अक्षरशः चक्रावून गेले

तळेगाव ढमढेरे : येथे प्रापंचिक कारणातून पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करत पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याची भयानक घटना घडली आहे. सविता मनोहर कांबळे वत ३८ वर्षे सध्या रा.आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता.शिरुर जि.पुणे,मूळ रा.शिरसो श्रीरामनगर ता.मूर्तिजापूर जि.अकोला असे खून झालेल्या महिलेचे तर मनोहर नागोराव कांबळे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पोलीस हवालदार अमोल चव्हाण, पोलीस शिपाई मच्छिंद्र निचित, नागेश वाघमारे हे पहाटेच्या सुमारास कर्तव्यावर हजर असताना अचानक एक इसम पोलीस स्टेशनमध्ये आला. त्याने मी माझ्या बायकोचा खून केला असल्याचे सांगितल्याने पोलीस अक्षरशः चक्रावून गेले. दरम्यान पोलिसांनी सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याच्या तळेगाव ढमढेरे येथील घरी घेऊन पाहणी करण्यासाठी गेले. घराला बाहेरुन कडी असल्याने पोलिसांनी कडी उघडून आतमध्ये पाहणी केली. त्यावेळी सदर इसमाची पत्नी सविता कांबळे घरात आतमध्ये घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली असून शेजारीच लोखंडी हातोडी पडल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यांनी तातडीने नागरिकांच्या मदतीने सविता कांबळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र सविता मनोहर कांबळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार चंद्रकांत काळे, प्रतीक जगताप यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला आहे.  घडलेल्या प्रकाराबाबत राजेश मनोहर कांबळे वय १९ वर्षे सध्या रा. आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि.पुणे,मूळ रा.शिरसो श्रीराम नगर ता.मूर्तिजापूर जि.अकोला याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी मनोहर नागोराव कांबळे वय ५३ वर्षे सध्या रा.आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे ता.शिरुर जि.पुणे,मूळ रा.शिरसो श्रीरामनगर ता.मूर्तिजापूर जि.अकोला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप हे करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband Murders Wife, Surrenders at Police Station in Shirur

Web Summary : In Shirur, a husband murdered his wife with a hammer due to domestic issues and surrendered to the police. The victim was found in a pool of blood at their home. Police have arrested the accused and are investigating.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूArrestअटकShikrapurशिक्रापूर