शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मी कोयता वरच्या वर पकडून बॅग अंगावर फेकली; धाडसी तरुणाने सांगितला सदाशिव पेठेतील घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 17:20 IST

तरुणी मदतीसाठी हाक मारत असताना कुणीच तिच्या मदतीला आलं नाही, तो तिच्यावर वार करणार तेवढ्यात मी त्याचा कोयता वरच्या वर पाकसुन बॅग अंगावर फेकली

पुणे : पुण्याच्या सदाशिव पेठेतील तरुणीवर प्राणघातक हल्ला झाला. या थरारक घटनेने नागरीकातून संताप व्यक्त होऊ लागला आहे. दर्शन पवारच्या ताज्या प्रकरणानंतर लगेचच अशी घटना घडल्याने मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला झाला तेव्हा तिला वाचवायला लवकर कोणी आले नाही. अशावेळी एका धाडसी तरुणाने न घाबरता तरुणीला वाचवले आहे. मी कोयता वरच्या वर पकडून बॅग अंगावर फेकल्याचे तरुणाने सांगितले आहे. 

या धक्कादायक घटनेत तरुणी आणि तिचा मित्र गाडीवरून जाताना दिसत आहेत. त्यावेळी अचानक आरोपी तरुण त्यांच्या शेजारी येऊन अडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचेही व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. गाडीवरचा तरुण लगेच उतरून आरोपी तरुणाला ढकलताना दिसून आले आहे. तेवढ्यात आरोपीने कोयता काढून वार करण्यास सुरुवात केली आहे. त्यावेळी मुलीबरोबर असणारा तरुण आरोपीपासून लांब गेला आहे.  आणि आरोपी कोयता घेऊन तरुणीच्या मागे धावत जाताना दिसत आहे. पुढे जाऊन आरोपीने तरुणीवर प्राणघातक हल्लाही केला आहे. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. हे घडत असताना आजूबाजूच्या नागरिकांनी तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुण जोरजोरात कोयता फिरवू लागला. त्यावेळी हा तरुण धावून आला. आणि त्याने जीवाची परवा न करता आरोपी तरुणाशी सामना केला. 

"मी अभ्यासिकेत जाताना मला हा आरोपी तरूण तरूणीवर हल्ला करताना दिसला. मग तो तिच्या पाठीमागे पळत होता. ती पुढे जाऊन खाली बसली आणि मदतीसाठी हाक मारत होती पण कुणीच तिच्या मदतीला आलं नाही. तो तिच्यावर वार करणार तेवढ्यात मी त्याचा कोयता वरच्या वर पकडला आणि बॅग त्याच्या अंगावर फेकली. त्यानंतर माझ्या मदतीला एकजण आला आणि आम्ही दोघांनी पकडून त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं असल्याचे तरुणीला वाचवलेल्या तरुणाने सांगितले आहे.'' 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीPoliceपोलिसcollegeमहाविद्यालयCrime Newsगुन्हेगारी