चांगल्या मित्रांची निवड करा; चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा- अजित पवार

By मुकेश चव्हाण | Published: January 29, 2021 12:47 PM2021-01-29T12:47:32+5:302021-01-29T13:03:35+5:30

पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजित पवारांनी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला.

I got involved in politics; Now you can't go anywhere and even get out - Deputy CM Ajit Pawar | चांगल्या मित्रांची निवड करा; चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा- अजित पवार

चांगल्या मित्रांची निवड करा; चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा- अजित पवार

Next

पुणे: कोणत्याही क्षेत्रात जा, पण आई वडिलांचे नाव रोशन करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला. चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा, विश्वासार्हता संपली की माणूस संपतो. मित्र निवडताना चांगले मित्र निवडा, मित्रच बरबाद करायला असतात, असं वक्तव्यही अजित पवार यांनी केलं. पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजित पवारांनी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला.

राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलोय आणि अडकलोय. कुठं जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, असंही अजित पवरांनी यावेळी हसत सांगितलं. तसेच आम्ही कधीपर्यंत खुर्चीवर, तर जनतेने सांगितलं तोपर्यंत. जनता म्हटली घरी बसा, की चाललो आम्ही. पण सीईओ बघा. जोपर्यंत रिटायर होत नाही, तोपर्यंत खुर्चीवर असतो. शिवाय प्रमोशन होत जातं. अभिनेता, कला, संगीत, पत्रकारिता अशी वेगवेगळी क्षेत्र निवडू शकता, असा मोलाचा सल्ला देखील अजित पवारांनी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला. 

कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नवं माध्यम स्वीकारलं पाहिजे. ऑनलाईन शिक्षण सुरु आहे, पण कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन देखील अजित पवार यांनी यावेळी केलं. मला खूप जण भेटतात. कोरोनामुळे आमची नोकरी गेल्याचं सांगतात. त्यामुळे मुलांनो करिअर निवडताना विचार करा, आपल्या वडिलांना विचारा, असं अजित पवारांनी सांगितलं. 

Web Title: I got involved in politics; Now you can't go anywhere and even get out - Deputy CM Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.