माझ्याच चित्रपटावर अन्याय का झालाय, हे कळत नाही; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची संतप्त भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 12:23 PM2023-05-06T12:23:20+5:302023-05-06T12:23:50+5:30

जर एवढी वाईट वागणूक मराठी चित्रपटांना मिळाली तर आगामी काळात नवीन चित्रपट बनवावा की नाही? याबाबत विचार करावा लागेल

I don't know why injustice has been done to my own film Angry feeling of director Bhaurao Karhade | माझ्याच चित्रपटावर अन्याय का झालाय, हे कळत नाही; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची संतप्त भावना

माझ्याच चित्रपटावर अन्याय का झालाय, हे कळत नाही; दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंची संतप्त भावना

googlenewsNext

पुणे: माझ्याच चित्रपटावर अन्याय का झालाय, हे कळत नाही. पण नक्कीच काही तरी वेगळे कारण आहे. यापुढील काळात एखादा नवीन चित्रपट तयार केला तर तो चित्रपटगृहात प्रदर्शित करायचा का नाही? यावर विचार करावा लागेल, अशी संतप्त भावना ‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली.

'ख्वाडा’ आणि ‘बबन’ चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय 'टीडीएम' चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मांडला आहे. मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र चित्रपटाला पुरेशा स्क्रीन उपलब्ध न झाल्याने त्यांनी व्यथित होऊन चित्रपटाचे शो थांबविण्याचा निर्णय घेतला. मराठी चित्रपटांवर होणाऱ्या या अन्यायाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. इतकी वाईट वागणूक जर मराठी चित्रपटांना मिळत असेल तर आगामी काळात नवीन चित्रपट बनवावा की नाही? याबाबत विचार करावा लागेल. ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक वेबसीरिज आणि चित्रपट आणण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. ‘टीडीएम’ चित्रपटातील नायक अन् नायिकेची निवड कशी केली? त्यामागची कहाणीही त्यांनी सांगितली.

‘टीडीएम’ हे नाव पहिल्यांदा

२००२ मध्ये कीर्तनातून प्रबोधन करताना एका महाराजांनी ग्रामीण भागात तरुणांना शेतात काम करताना ट्रॅक्टरचे आकर्षण असायचे म्हणून टीडीएम म्हणजे, ट्रॅक्टर, ड्रायव्हर ऑफ महिंद्रा असे नाव दिले. तेच नाव घेऊन ग्रामीण भागाचे वास्तव चित्र मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला असल्याचे कऱ्हाडे म्हणाले. ग्रामीण भागाचे वास्तव चित्र मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केले आहे, तर ग्रामीण भागातील साधा पृथ्वीराज व साधी हीरोईन म्हणून कालिंदीला संधी दिली. नवोदित जोडगोळी अभिनेता पृथ्वीराज थोरात आणि अभिनेत्री कालिंदी निस्ताने यांची अस्सल प्रेमकथा, त्यांचे अस्सल गावरान ठसकेबाज संवाद आणि सोबतीला रांगड्या पृथ्वीचा ॲक्शन अवतार असं सगळं काही या चित्रपटात ग्रामीण भागातील जुन्या आठवणींना उजाळा दिला असल्याचे सांगितले. तसेच मुळात या चित्रपटातील ग्रामीण भागातील तरुणांच्या प्रेमकहाणीच्या प्रवासात तो कसा भारी याची हुबेहूब मांडणी केली आहे. ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ या चित्रपटांविषयी वेगवेगळ्या भूमिका कशा घेतल्या याबद्दल भाष्य करण्यात आले.

Web Title: I don't know why injustice has been done to my own film Angry feeling of director Bhaurao Karhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.