पोटगीची रक्कम थकवली म्हणून पतीला तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 01:30 AM2019-01-12T01:30:29+5:302019-01-12T01:30:51+5:30

पत्नीच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन घटस्फोट घेऊन त्याने दुसरे लग्न केले.

The husband's imprisonment as the amount of baggage is tired | पोटगीची रक्कम थकवली म्हणून पतीला तुरुंगवास

पोटगीची रक्कम थकवली म्हणून पतीला तुरुंगवास

Next

पुणे : पत्नी आणि दोन मुलींना द्यायची एक लाख ६६ हजार रुपयांची पोटगी थकविल्याच्या प्रकरणात न्यायालयाने पतीला सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा निकाल दिला. दशरथ हनुमंत मळेकर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख ६६ हजार रुपये पोटगीची रक्कम येणे बाकी आहे. पोटगी रक्कम थकविल्यामुळे त्याच्याविरुद्ध वॉरंट काढण्यात आले होते. त्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.

पत्नीच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन घटस्फोट घेऊन त्याने दुसरे लग्न केले. पहिली पत्नी आणि दोन मुलींना १३ हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश न्यायाधीश प्रसाद पालसिंगनकर यांनी दिला होता. मात्र, त्याने आदेशाचे पालन केले नाही. त्याच्याकडून पैसे भरण्यात
आले नाहीत म्हणून वॉरंट काढण्यात आले होते. अर्जदार महिलेतर्फे अ‍ॅड. मनीषा गोळे-माने यांनी पाठपुरावा केला. पोटगीची रक्कम द्यावी लागेल; म्हणून तो सतत घरे बदलत होता. त्याच्या राहत्या घराचा पत्ता न्यायालयात दाखल करेपर्यंत त्याने घर बदलेले असायचे.
पोटगीची रक्कम न भरल्यामुळे त्याच्याविरुद्ध वॉरंट काढण्यात आले होते. त्याला पकडण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार फडतरे यांनी साह्य केले, अशी माहिती अ‍ॅड. माने यांनी दिली.

Web Title: The husband's imprisonment as the amount of baggage is tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.