शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Pune Crime: घटस्फोट घेऊनही पतीचे पहिल्या पत्नीशी अनैतिक संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 11:43 IST

दुसऱ्या पत्नीला मारहाण करून तिची फसवणूक करण्याचा प्रकार...

पुणे : पहिल्या पत्नीशी घटस्फोट झालेला असतानाही तिच्याशी अनैतिक संबंध ठेवत दुसऱ्या पत्नीला मारहाण करून तिची फसवणूक करण्याचा प्रकार घडला. याबाबत पतीसह पहिली पत्नी आणि तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करा, असे आदेश लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.एन. अंधारे यांनी कोंढवा पोलिसांना दिले आहेत.

दरम्यान, कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज देऊनही कोणतीच कारवाई न झाल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पतीला अंतरिम पोटगीचा आदेश देऊनही त्याने फिर्यादीला पोटगी दिलेली नाही. याबाबत फिर्यादीने पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कोंढवा पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देऊनही त्याची दखल घेतली नसल्याने न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीमधील सर्व कलमे दखलपात्र गुन्ह्यामध्ये मोडतात. हे सर्व गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे पोलिसांमार्फत या तक्रारीची चौकशी होणे गरजेचे आहे. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणाची फौजदारी गुन्हे संहितेच्या १५६ (३) अंतर्गत चौकशी करावी, असे आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार, पोलिसांनी पती इम्रान इलियास खान, पहिली पत्नी राधिका मदन चव्हाण आणि तिची आई रिना मदन चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवावे, असे आदेश दिले आहेत. ॲड.नीता भवर यांनी न्यायालयात फिर्यादीच्या बाजूने युक्तिवाद केला. त्यांना या केससाठी ॲड.तेजस्विनी कांबळे, ॲड.धनश्री बोऱ्हाडे आणि ॲड.रसिका मेढकर यांनी सहकार्य केले.

फिर्यादी ही इम्रान इलियास खान याची दुसरी पत्नी आहे. १७ जानेवारी, २०२१ मध्ये दोघांचा विवाह झाला. लग्नापूर्वी पतीचा पहिला घटस्फोट झाल्याचे फिर्यादीला माहीत होते. देहूरोड भागात फिर्यादी पती, सासू आणि सासरे यांच्याबरोबर राहत होती. लग्नानंतर पहिली पत्नी पतीच्या संपर्कात आली. ती एका खासगी एअरलाइन्स कंपनीत हवाई सुंदरी आहे. दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे फिर्यादीला कळले. सुधारण्याचे आश्वासन देऊनही पती सुधारला नाही.

कंपनीचीही फसवणूक

पहिली पत्नीही फिर्यादीला फोनवरून धमकावत असे. गर्भवती असताना पतीने फिर्यादीला पोटावर मारहाण केल्याने तिचा गर्भपात झाला. फिर्यादीने पहिल्या पत्नीच्या आईला सांगूनही तिने फिर्यादीला शिवीगाळ केली. हवाई सुंदरी आणि फिर्यादीचा पती दोघेही स्टाफ ट्रॅव्हलर म्हणून सोबत फिरत असतात. तिने तो आपला पती असल्याचे भासवत कंपनीचीही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदारDivorceघटस्फोट