मतिमंद नवरा पसंत नसल्याने सासवडमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 11:49 IST2017-11-07T11:47:39+5:302017-11-07T11:49:59+5:30

सासवड येथील सचिन चौधरीचा खून सचिनची पत्नी अर्चना हिने तिचा प्रियकर बलवान ऊर्फ बाळू तानाजी अष्टे (वय २५) याच्या मदतीने पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. अर्चना व बाळू अष्टे यांना सासवड पोलिसांनी अटक केली आहे. 

husband murdered by wife in saswad | मतिमंद नवरा पसंत नसल्याने सासवडमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

मतिमंद नवरा पसंत नसल्याने सासवडमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचा खून

ठळक मुद्देअर्चना हिने प्रियकर बाळू अष्टे (वय २५, रा. कर्नाटक) याच्या मदतीने पतीचा खून केल्याचे निष्पन्नअर्चना व बाळू अष्टे यांना सासवड पोलिसांनी केली अटक

सासवड : उमरगा (जि. उस्मानाबाद) येथे सासवड येथील सचिन चौधरीचा खून सचिनची पत्नी अर्चना हिने तिचा प्रियकर बलवान ऊर्फ बाळू तानाजी अष्टे (वय २५, रा. उजळम, ता. बसवकल्याण, कर्नाटक) याच्या मदतीने पतीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सचिन मतिमंद असल्याने तो आवडत नसल्याच्या कारणावरून दोघांनी खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. अर्चना व बाळू अष्टे यांना सासवड पोलिसांनी अटक केली आहे. 
सासवड पोलिसांच्या माहितीनुसार,  सचिन मतिमंद असल्याने अर्चनाला पसंत नव्हता, याच वेळी अर्चना गरोदर असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. सचिन याचा काटा काढण्यासाठी अर्चना बाळू अष्टे याच्या संपर्कात होती. तिने सचिन याचे काय करायचे, याबाबत कल्पना दिली असता अष्टे याने सचिन यास उमरगा येथे घेऊन ये, असे सांगितले होते.

 

हरवल्याची तक्रार
२६ आॅक्टोबर रोजी सासवड येथून सचिन चौधरी व त्याची पत्नी अर्चना  घराबाहेर फिरायला गेले होते. रात्री उशिरापर्यंत परतले नसल्याने सचिनच्या वडिलांनी सासवड पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दाखल केली होती. २८ आक्टोबरला अर्चना उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील मावस मामाकडे आल्याचे समजल्यानंतर सासवड ठाण्याचे कर्मचारी भागवत व सचिनचे वडील अरविंद चौधरी यांनी त्या ठिकाणी जाऊन अर्चनाकडे विचारपूस केली.

Web Title: husband murdered by wife in saswad