उमरगा पालिकेतील सहायक प्रकल्प अधिकारी जेरबंद

By Admin | Published: January 6, 2017 11:54 PM2017-01-06T23:54:27+5:302017-01-06T23:58:14+5:30

उमरगा : उमरगा पालिकेचे सहायक प्रकल्प अधिकारी मारूती एकनाथ भादुले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जेरबंद केले़

Zirband, assistant project officer of Umarga Palik | उमरगा पालिकेतील सहायक प्रकल्प अधिकारी जेरबंद

उमरगा पालिकेतील सहायक प्रकल्प अधिकारी जेरबंद

googlenewsNext

उमरगा : रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करून घेऊन पहिल्या हप्त्याचा चेक देण्यासाठी तीन हजार रूपये घेताना उमरगा पालिकेचे सहायक प्रकल्प अधिकारी मारूती एकनाथ भादुले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जेरबंद केले़ ही करवाई शुक्रवारी उमरगा येथे करण्यात आली असून, या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा शहरातील तक्रारदार यांनी रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून १६ जुलै रोजी नगर परिषदेतील आवक-जावक विभागात अर्ज दिला होता़ त्यानंतर तक्रारदारांनी पालिकेतील सहायक प्रकल्प अधिकारी मारूती एकनाथ भादुले यांना याबाबत विचारणा केली होती़ त्यावेळी मारूती भादुले यांनी घरकुल मंजूर करून देण्यासाठी व पहिल्या हप्त्याचा चेक देण्यासाठी तीन हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीच्या कार्यालयात केली होती़
तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबीचे अधीक्षक डॉ़ श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक गवारे, पोलीस उपअधीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आसिफ शेख, पोनि बाळासाहेब आघाव, पोना पांडुरंग उंबरे, बालाजी तोडकर, नितीन सुरवसे, पोकॉ राहुल नाईकवाडी, चालक धनंजय म्हेत्रे यांच्या पथकाने उमरगा पालिकेत सापळा रचून लाचेची पडताळणी केली होती़ त्यानंतर शुक्रवारी सकाळी पालिकेत सापळा रचण्यात आला़ त्यावेळी तक्ररदाराच्या कामासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मारूती भादुले यांनी तीन हजार रूपये लाचेची मागणी करून ते स्वीकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या कारवाईमुळे पालिकेतील लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़ याबाबत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोनि आसिफ शेख हे करीत आहेत़

Web Title: Zirband, assistant project officer of Umarga Palik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.