पतीने केलेल्या गंभीर मारहाणीत पत्नीचा मृत्यू : विश्रांतवाडी भिमनगर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 18:08 IST2019-07-21T18:05:40+5:302019-07-21T18:08:24+5:30

पतीने पत्नीला केलेल्या गंभीर मारहाणीत पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Husband murdered in his wife | पतीने केलेल्या गंभीर मारहाणीत पत्नीचा मृत्यू : विश्रांतवाडी भिमनगर येथील घटना

पतीने केलेल्या गंभीर मारहाणीत पत्नीचा मृत्यू : विश्रांतवाडी भिमनगर येथील घटना

पुणे : पतीने पत्नीला केलेल्या गंभीर मारहाणीत पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेत रमाबाई ज्ञानेश्वर गायकवाड (वय 35,रा.भिमनगर विश्रांतवाडी) यांचा खून झाला असून याप्रकरणी त्यांचा पती ज्ञानेश्वर आबा गायकवाड (वय40) याला विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.19 जुलै रोजी रमाबाई व ज्ञानेश्वर यांच्यात वादावादी झाली. या भांडणात ज्ञानेश्वर याने  रमाबाई हिच्या डोक्यात लोखंडी राॅड मारून गंभीर जखमी केले. स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान शनिवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.वैयक्तिक कारणांमुळे पतीने हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी भेटी दिल्या.  याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल  करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Husband murdered in his wife