पतीने काढला पत्नीचा अश्लील व्हिडीओ; नातेवाईकांना पाठवत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी
By भाग्यश्री गिलडा | Updated: June 9, 2024 15:14 IST2024-06-09T15:13:29+5:302024-06-09T15:14:24+5:30
पतीने दहा महिन्यांपूर्वी व्हाट्सऍपवर व्हिडीओ कॉल करून बदनामी करण्याची धमकी देत अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडले

पतीने काढला पत्नीचा अश्लील व्हिडीओ; नातेवाईकांना पाठवत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी
पुणे: पतीने आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्या नातेवाईकांना पाठवल्याचा घृणास्पद प्रकार समोर आलाय. याप्रकरणी आरोपी पती सुधीर शरणप्पा पुजारी (रा. शिवाजीनगर गावठाण) याच्यावर शनिवारी (दि. ८) विश्रामबाग पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबबत शनिपार परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणीने पोलिसांना फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीच्या पतीने दहा महिन्यांपूर्वी व्हाट्सऍपवर व्हिडीओ कॉल करून बदनामी करण्याची धमकी देत अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडले. आरोपी सुधीर याने व्हिडीओ कॉल सुरु असताना स्क्रीन रेकॉर्डिंग केले. ते रेकॉर्डिंग पीडितेच्या नातेवाई, भाऊ,चुलते, दाजी, मैत्रीण यांना पाठवले. तसेच वरील सर्वांना फोन करून हा व्हिडीओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घोडके हे करत आहेत.