चारित्र्याच्या संशयावरुन पतीने चाकूने वार करुन पत्नीचा केला खून; पुणे शहरातील घटना

By विवेक भुसे | Updated: November 2, 2022 13:00 IST2022-11-02T12:56:48+5:302022-11-02T13:00:04+5:30

पत्नीवर वार करुन तिचा खून...

husband killed his wife by stabbing her because of suspicion of her character; Incident in Pune city | चारित्र्याच्या संशयावरुन पतीने चाकूने वार करुन पत्नीचा केला खून; पुणे शहरातील घटना

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने चाकूने वार करुन पत्नीचा केला खून; पुणे शहरातील घटना

पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने चाकूने पत्नीवर वार करुन तिचा खून केल्याचा प्रकार येरवड्यातील जय जवाननगर येथे घडला. अंकिता अनिल तांबूटकर (वय ४५, रा. दुगार्माता मंदिराजवळ, जय जवाननगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी तिचा पती अनिल मनोहर तांबूटकर (वय ५०) याला अटक केली आहे.

अंकिता आणि अनिल तांबूटकर हे जय जवाननगरमध्ये राहत होते. अनिल नेहमीच अंकिताच्या चारित्र्याचा संशय घेत असे. त्यावरुन मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात भांडणे झाली. रागाच्या भरात त्याने चाकूने तिच्या छातीवर, गळ्यावर वार केले. अंकिता घरात रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून तिला रुग्णालयात दाखल केले़ परंतु अति रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती होताच पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, निरीक्षक उत्तम चक्रे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी पतीला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद खटके तपास करीत आहेत.

Web Title: husband killed his wife by stabbing her because of suspicion of her character; Incident in Pune city