पौर्णिमेला गरोदर राहिल्याच्या कारणावरून पतीने पोटावर मारल्या लाथा ; अंधश्रद्धेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 20:11 IST2018-04-16T20:11:29+5:302018-04-16T20:11:29+5:30

पौर्णिमेला गर्भवती राहणारी महिला मुलीला जन्म देते. असा त्यांचा समज असल्याने सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरूवात केली. एवढेच नव्हे तर पौर्णिमेला गर्भधारणा झाली असल्याने कोणतेच बाळ जन्माला येऊ नये, या भावनेतून तिचा मोठ्या प्रमाणावर मानसिक छळ केला

Husband Kick on stomach her pregnant women ; climax of superstition | पौर्णिमेला गरोदर राहिल्याच्या कारणावरून पतीने पोटावर मारल्या लाथा ; अंधश्रद्धेचा कळस

पौर्णिमेला गरोदर राहिल्याच्या कारणावरून पतीने पोटावर मारल्या लाथा ; अंधश्रद्धेचा कळस

ठळक मुद्देअंधश्रद्धेला खतपाणी घालणारी थेरगावातील धक्कादायक घटना गर्भ खाली करण्याच्या उद्देशाने तिच्या पोटावर लाथा

पिंपरी : थेरगावमध्ये २४ वर्षीय महिला पौर्णिमेच्या दिवशी गर्भवती राहिली म्हणून तिच्या गर्भात मुलगीच असल्याच्या संशयावरून सासरकडील मंडळींनी तिला जबर मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे पतीनेही जबर मारहाण करीत गर्भ पाडण्याच्या उद्देशाने तिच्या पोटात लाथ मारल्याचा प्रकार उघडकीस आला. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी ही घटना थेरगावातील कैलासनगरमध्ये घडली. स्वाती संजय पवार (वय २४, रा. कैलास नगर, थेरगाव) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिने पती संजय पांडुरंग पवार याच्यासह सासू सुमन पांडुरंग पवार, नणंद अर्चना हर्षद यादव यांच्याविरुध्द वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वाती पवार या थेरगाव येथे कैलास नगरमध्ये पती संजय सोबत राहतात. त्या पौर्णिमेच्या दिवशी गर्भवती राहिल्याचे समजताच, अंधश्रद्धचे पालन करणारे तिचे पती तसेच सासरचे लोक तिला मुलगीच होणार असे म्हणू लागले. पौर्णिमेला गर्भवती राहणारी महिला मुलीला जन्म देते. असा त्यांचा समज असल्याने सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरूवात केली. एवढेच नव्हे तर पौर्णिमेला गर्भधारणा झाली असल्याने कोणतेच बाळ जन्माला येऊ नये, या भावनेतून तिचा मोठ्या प्रमाणावर मानसिक छळ केला जावू लागला.सासू  आणि नणंद या काही दिवसांपासून स्वातीला मानसिक छळ करुन मारहाण करीत होत्या. शनिवारी रात्री तर त्यांनी कहरच केला. छळाची परिसीमा गाठली. पती संजय याने तिच्याबरोबर भांडण करून आणि गर्भ खाली करण्याच्या उद्देशाने तिच्या पोटावर लाथा मारल्या. स्वातीने थेट वाकड पोलीस ठाणे गाठले आणि पतीसह सासरच्या मंडळींच्या विरोधात फिर्याद दिली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत. खासगी रूग्णालयात जावून स्वातीने उपचार घेतले. 

Web Title: Husband Kick on stomach her pregnant women ; climax of superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.