शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने केली फजिती! पत्नी अडकली मलेशियात आणि पती भारतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 12:47 IST

सरकारला परदेशातील भारतीयांना मायदेशात आणण्याचे आवाहन

ठळक मुद्दे लॉकडाऊनमुळे बिकट परिस्थिती  जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडावे लागते अशावेळी भाषेचा अडसर

युगंधर ताजणे पुणे : आईला भेटायला म्हणून भारतात आलो होतो. त्यापूर्वी साधारण दोन महिने अगोदर पत्नी माझ्याकडे मलेशियात आली होती. आईला भेटून निघण्याची तयारीत असताना लॉकडाऊन वाढला. विमानतळावर गेल्यावर तिथे सर्व उड्डाणे बंद करण्यात आली आहेत असे समजले. पुन्हा घरी आलो. आता मी भारतात तर पत्नी मलेशियात आहे. भारतातील लॉकडाऊन पुढे वाढण्याची भीती वाटत असल्याने पत्नीची काळजी वाटू लागली आहे. सरकारने परदेशात गेलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्याचा विचार करावा. अशी मागणी पत्नीच्या सुटकेसाठी पतीने सरकारकडे केली आहे. लॉकडाऊननंतर 48 दिवस घरात पत्नीला एकटे राहावे लागले आहे. तेथील परिस्थिती अद्याप नियंत्रणात नसल्याने चिंता आणखी वाढली आहे. पुण्यातील वानवडी येथे राहणाऱ्या आणि गेल्या आठ महिन्यांपासून मलेशियातील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या वैभव (नाव बदलले आहे) यांची पत्नी सध्या मलेशियात आहे. ती 'डिपेंटड व्हिसावर त्यांच्याकडे गेली होती. त्या दरम्यान अनिल आईला भेटण्यासाठी भारतात आले होते. मात्र लॉकडाऊन झाल्यानंतर ते पुन्हा मलेशियात जायला निघाले असताना त्यांना लॉकडाऊन असल्याने जाता येणार नसल्याचे समजले. अशा परिस्थितीत मलेशियात असणाऱ्या आपल्या पत्नीची चिंता त्यांना सतावू लागली. याचे मुख्य कारण म्हणजे भाषेची अडचण. पत्नीला मराठी आणि हिंदी याशिवाय इतर कुठली भाषा येत नसल्याने त्यांना संवाद साधण्यास अडचण येत आहे. मलेशियात देखील लॉकडाऊनची स्थिती कायम आहे. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडावे लागते अशावेळी भाषेचा अडसर येत असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पूर्ण जगभरात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. कित्येकजण वेगवेगळ्या देशात अडकून पडले आहेत. काही देशांनी आपल्या नागरिकांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी स्वतंत्र विमाने पाठवण्यास सुरुवात केली आहे. भारतात देखील ऑस्ट्रेलियन नागरिकांना पुन्हा त्यांच्या मायदेशी नेल्याची माहिती मिळाली आहे. अशावेळी भारताने देखील आपल्या नागरिकांना पुन्हा आणण्यासाठी विशेष मोहीम राबवल्यास शेकडो परदेशी भारतीयांना दिलासा मिळेल. आपण सातत्याने पीएमओ आणि सीएमओ यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वर देखील संपर्क साधला. मात्र त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही. असेही अनिल यांनी यावेळी सांगितले. 

 शेजारच्यांना किती त्रास द्यायचा ? सोसायटीत शेजारी राहणाऱ्या व्यक्तींना फोन केला असता ते मदतीला धावून येतात. ते वेगवेगळ्या देशाचे रहिवासी आहेत. आवश्यक वस्तू आणून देणे, संपर्क करून देणे, कुठे बाहेर जायचे असल्यास वाहन बुक करणे, स्थानिक नागरिकांशी संवाद साधून प्रशासनाने ज्या सूचना दिल्या आहेत ते पोहचवणे. त्यांच्याशी फोनवर बोलणे सुरू असून त्यांनी दिलेली माहिती पत्नीला देतो. जेणेकरून तिला बाहेर काय परिस्थिती आहे याचा अंदाज येतो. दरवेळी शेजारच्या व्यक्तींना त्रास द्यायचा हे बरे वाटत नाही. असे वैभव यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत