पुणे | दिराकडून भावजयीचा चाकूने गळा कापून खून; वडगावशेरीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 10:44 IST2022-11-12T10:43:43+5:302022-11-12T10:44:11+5:30
वडगावशेरी परिसरात शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला...

पुणे | दिराकडून भावजयीचा चाकूने गळा कापून खून; वडगावशेरीतील धक्कादायक घटना
पुणे : दिराने आपल्या भावजयीचा चाकूने गळा कापून खून केला. वडगावशेरी परिसरात शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. लक्ष्मीबाई श्रीराम (वय ५४, रा. बिडी कामगार वसाहत, चंदनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी तिचा दीर श्रीनिवास श्रीराम याला अटक केली आहे. याबाबत सागर रमेश दासा (वय ३९, मारुतीनगर वडगावशेरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीनिवास याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीनिवास आणि खून झालेली महिला लक्ष्मीबाई हे दोघे दीर-भावजयी आहेत, तर फिर्यादी सागर हेदेखील श्रीनिवास याचे मित्र आहेत. लक्ष्मीबाई या फिर्यादी सागर यांच्या घरी धार्मिक कार्यासाठी आल्या हाेत्या. सागर आणि त्यांची पत्नी घराबाहेर गेल्यानंतर श्रीनिवास याने चाकूने लक्ष्मीबाई यांचा गळा चिरून खून केला.