पत्नीने दिवसभर फोन न उचलल्याने पतीची लोखंडी गजाने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 15:33 IST2022-01-30T15:15:56+5:302022-01-30T15:33:00+5:30
पतीचा दिवसभर फोन न घेतल्यामुळे राग अनावर होऊन पत्नीला लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी पतीवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

पत्नीने दिवसभर फोन न उचलल्याने पतीची लोखंडी गजाने मारहाण
राजगुरुनगर : पतीचा दिवसभर फोन न घेतल्यामुळे राग अनावर होऊन पत्नीला लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी पतीवर खेडपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दिपक शिवाजी चाटे (वय ३५ रा नारायणगाव ता . जुन्नर ) असे आरोपीचे नांव आहे. या घटनेत २५ वर्षीय पिडित या मारहाणीत जखमी झाली आहे.
या घटनेबाबत खेडपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दि २९ रोजी ही घटना घडली. पिडित पत्नीने पती दिपक शिवाजी चाटे याचा दिवसभर फोन उचलला नाही. त्याचा राग आल्याने राजगुरुनगर येथे ममता गाऊन शॉपी दुकानासमोर येऊन पती चाटे यांने पत्नीला शिवीगाळ दमदाटी करून हात पिरंगळून लोखंडी गजाने डोक्यात मारून मला जखमी केले. याबाबत पत्नीने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास खेड पोलिस करित आहे.