चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणारा पती अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:47 IST2018-07-16T21:46:50+5:302018-07-16T21:47:06+5:30

चारित्र्याच्या संशयावरून कविता यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यामध्ये वीट मारून जखमी केले. त्यानंतर त्याने घरात कपडे वाळत टाकण्याच्या दोरीने कविता यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला,

husband arrested for attempting tried murder of wife | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणारा पती अटकेत

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणारा पती अटकेत

ठळक मुद्देआरोपीला तीन दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात वीट मारूननंतर दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची तीन दिवस पोलीस कोठडीमध्ये  ठेवण्याचा आदेश दिला आहे. 
   सोमनाथ सोनबा कुदळे (वय ४८, रा. नाना पेठ) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी कविता कुदळे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. १५ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. 
सोमनाथ याने चारित्र्याच्या संशयावरून कविता यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यामध्ये वीट मारून जखमी केले. त्यानंतर त्याने घरात कपडे वाळत टाकण्याच्या दोरीने कविता यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सोमनाथ याला न्यायालयात हजर केले असता गुन्ह्यात वापरलेली वीट जप्त करण्यासाठी, हा गुन्हा करण्यामागे त्याचा काय हेतू होता? तसेच गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने सोमनाथला पोलीस कोठडी दिली. 

Web Title: husband arrested for attempting tried murder of wife