शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

करमणूक कर विभागाची शंभर टक्के करवसुली

By admin | Updated: April 1, 2017 02:16 IST

जिल्हा करमणूक कर विभागाने १५४ कोटी रुपयांची करवसुली करून शासनाने दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे

पुणे : जिल्हा करमणूक कर विभागाने १५४ कोटी रुपयांची करवसुली करून शासनाने दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे. नोटाबंदीमध्ये जुन्या नोटांमध्ये थकबाकी भरण्याची परवानगी देण्यात आल्याने सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये जमा झाले. तर वन डे व आयपीएल सामन्यांमुळेदेखील शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य झाले असल्याची माहिती जिल्हा करमणूक कर अधिकारी सुषमा पाटील-चौधरी यांनी दिली.शासनाच्या वतीने जिल्हा करमणूक कर विभागाला सन  २०१६-१७ या वर्षांसाठी १५४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. यात वर्षाच्या सुरुवातीलचा राज्यात सर्वाधिक गाजलेल्या सैराट चित्रपटामुळे करमणूक कर  विभागाला तब्बल सहा कोटी रुपयांचा फटका बसला. मराठी चित्रपटांना करमणूक कर माफ असल्याने सैराट चित्रपटाने शंभर ते दीडशे कोटी रुपयांची कमाई करूनही करमणूक कर विभागाला महसूल मिळालाच नाही. त्यातच सैराटच्या धसक्याने दोन-अडीच महिन्यांत एकही चांगला हिंदी चित्रपट सुरु करण्यात आला नाही. या सर्वांचा मोठा परिणाम करमणूक कर विभागाच्या वसुलीवर झाला. परंतु त्यानंतर शासनाने आॅगस्ट महिन्यात ५०० व १ हजार रुपयांच्या चलनातील नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शासनाने काही दिवस जुन्या नोटांमध्ये शासनाच्या विविध विभागाच्या थकबाकीची रक्कम जमा करण्याची परवानगी दिली. यामुळे करमणूक कर विभागाला सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा कर जुन्या नोटांच्या स्वरूपात जमा झाला. त्यानंतर वादग्रस्त ठरलेल्या सनबर्न फेस्टिव्हलमुळे सुमारे ७७ लाखांचा कर जमा झाला. यंदा शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थर्टी फर्स्ट व होळीच्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले, जिल्हा प्रशासनाच्या वतीने बेकायदेशीरपणे पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्या हॉटेलवर केलेल्या कारवाई या सर्व गोष्टींमुळे जिल्हा करमणूक कर विभागाला करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य झाले असल्याचे पाटील-चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)