A huge fire broke out at a scrap godown in Baramati | बारामतीत भंगारच्या गोडाऊनला भीषण आग

बारामतीत भंगारच्या गोडाऊनला भीषण आग

ठळक मुद्देआगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

बारामती:  बारामती शहरातील फलटण रोडवरील मुल्ला वस्तीतील भंगारच्या गोदामाला आग लागल्याची घटना आज सकाळी ११ च्या सुमारास घडली. 

शहरातील फलटण रोडवर हे भंगाराचे गोदाम आहे. या गोडाऊनला आग लागली असून आगीचे लोट उसळत आहेत. आग धुमसत असून ती विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  या भंगाराच्या गोदामाला अर्ध्या तासापासून मोठी आग लागल्याचे स्थानिकांनी सांगितले. 

बारामती नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.  आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे . या आगीत सुदैवाने  कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेले भंगार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मोठे नुकसान झालें आहे. गोडाऊन जळून खाक झाले आहे.

दरम्यान येथील आगीच्या धुराचे लोट सुरूच आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. पोलीस देखील घटनास्थळी पोहचले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. तसेच आगीत झालेल्या नुकसानीचा आकडा समोर येण्यास वेळ लागणार आहे.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A huge fire broke out at a scrap godown in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.