Pune : वडगावशेरीत भंगार दुकानाला भीषण आग, दुकान जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 13:55 IST2022-11-03T13:51:07+5:302022-11-03T13:55:14+5:30
तब्बल दोन तासानंतर आग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश

Pune : वडगावशेरीत भंगार दुकानाला भीषण आग, दुकान जळून खाक
चंदननगर (पुणे) : वडगावशेरीतील एका भंगार दुकानाला आग लागून संपूर्ण दुकानाची राख झाली. आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारात वडगावशेरीतील सोपाननगर भागातील विक्रम गलांडे यांच्या मालकीच्या जागेत भंगाराचे दुकान व मोकळे गोडवून होते. यात अचानक आग लागल्याने संपूर्ण दुकानातील भंगार जळून खाक झाले. यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले. तब्बल दोन तासानंतर आग्निशमन दलाला ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
यावेळी चार अग्निशमन बंब, पाण्याचे टँकर यांच्या साहायाने ही आग आटोक्यात आणली. आग लागलेल्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. आग विझवण्यासाठी आग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी जाण्यासाठी मोठा अडथळा होत असल्याने स्थानिक चंदननगर पोलिसांनी बंदोबस्त देऊन गर्दी पांगविल्याने आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.