शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

'मातोश्री'वर बसून सामान्यांचा त्रास कसा कळणार ? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 16:38 IST

ठाकरे सरकार जर कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन करणार असेल तर त्याला आमचा कडवा विरोध असेल..

पुणे : राज्य शासन सर्वसामान्यांना एक रुपयांचेही पॅकेज देणार नाही़ मात्र, कोरोनावर नियंत्रणाच्या नावाखाली राज्य शासन जर लॉकडाऊन लागू करणार असेल, तर त्याला आमचा कडवा विरोध असेल, अशी भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडली. मातोश्रीवर बसून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना होणारा त्रास कसा कळणार, असा टोला पाटील यांनी लगावला़.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आयुक्तालयात चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील यांनी सांगितले की, कोरोनाच्या वाढत्या संख्येवर लॉकडाऊन हे उत्तर नाही. लॉकडाऊननंतर गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने एक रुपयांचे पॅकेज जाहीर केले नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, हे मातोश्रीमध्ये बसून कळणार नाही.

गेल्या दोन तीन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असताना राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या मानसिकतेत असेल तर त्याला आमचा विरोध असेल. देशाच्या अर्थव्यवस्थेत असंघटित कामगारांचे मोठे योगदान आहे़ लॉकडाऊन लागू केले तर त्याचा सर्वाधिक फटका हा असंघटित वर्गालाच बसेल. त्यामुळे त्यांनी अगोदार असंघटित क्षेत्रातील हातावर पोट असणार्‍यांना पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. .........पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाल्याचे वृत्ताबाबत चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, की भारतीय राजकारणात सत्ताधारी, विरोधक हे एकमेकांना भेटत असतात. त्यात वेगळे काही नाही. राज्यात काही बदल होण्याची शक्यता नाही. पक्षश्रेष्ठी जो काही आदेश देतील त्याचे राज्यात पालन केले जाते.

टॅग्स :PuneपुणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाState Governmentराज्य सरकार