शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या खासदारांचा आहेर कसा वाटतो? भाजपने सांगावे;काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 21:32 IST

शहर आता राहण्यालायक राहिले नाही, या भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे पदाधिकारी तुटून पडले आहेत. हा घरचा आहेर कसा वाटतो, असा प्रश्न भाजपला काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केला

पुणे : शहर आता राहण्यालायक राहिले नाही, या भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे पदाधिकारी तुटून पडले आहेत. हा घरचा आहेर कसा वाटतो, असा प्रश्न भाजपला काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी केला तर शहर राहण्यालायक कोणी ठेवले नाही, याचा विचार करा, असा सल्ला माजी नगरसेवक शिवा मंत्री यांनी दिला.

खासदार प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी शहराच्या अनेक नागरी समस्यांवर बोट ठेवत पुणे शहर आता राहण्यालायक राहिले नाही, अशी टीका केली. महापालिकेत सलग पाच वर्षे भाजपची एकहाती सत्ता होती. त्यानंतरची तीन वर्षेही लोकनियुक्त नगरसेवक अस्तित्वात नसताना भाजपनेच राज्य सरकार, आमदार यांच्या माध्यमातून महापालिकेवर वर्चस्व ठेवले. त्यामुळेच काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जोशी यांनी हा घरचा आहेर कसा वाटतो, असा प्रश्न भाजपच्या पुण्यातील नेत्यांना केला. शहराच्या विकासाची बकवास आता भाजप नेत्यांनी बंद करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

उपरोधिक शब्दात कुलकर्णी यांचे कौतुक

दुसरीकडे काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा मंत्री यांनी पक्षात राहून पक्षाच्या विरोधात खरे काय ते स्पष्टपणे बोलण्याच्या तुमच्या हिमतीची दाद दिली पाहिजे, अशा उपरोधिक शब्दात खासदार प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी कौतुक केले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. केंद्रात मंत्रिपदे, राज्यात मंत्रिपदे, महापालिकेतील महापौरांसह सर्व पदेही भाजपकडेच असे असताना शहर राहण्यालायक कोणी ठेवले नाही याचा विचार करणार की नाही, असा प्रश्न मंत्री यांनी केला आहे. सगळे मोठे प्रकल्प निविदेमध्येच कोणी अडकवले? काम सुरू असताना ते कोणी थांबवले? विशिष्ट ठेकेदार कंपन्यांनाच काम मिळावे, याची मोर्चेबांधणी कोणी केली? या सर्व प्रश्नांची उत्तरेही आपण अशाच हिमतीने मिळवा व पुणेकरांसाठी जाहीर करा, असेही मंत्री यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाcongressकाँग्रेसmedha kulkarniमेधा कुलकर्णी