Ajit Pawar Latest News: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गंमतीशीर विधानांचे व्हिडीओ तुम्ही बघितले असतील. स्पष्टवक्तेपणामुळे कुणी काही मुद्दा उपस्थित केला की, अजित पवारांना लगेचच त्यावर बोलून जातात. पण, त्यानंतर तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो. असाच काही प्रकार पुण्यात घडला. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात होते. एका कार्यक्रमात ते बोलत असताना एक व्यक्ती उठते आणि एक मुद्दा मांडते. त्यानंतर अजित पवार काय बोलले?
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'ट्री मॅन' म्हणून ओळख असणारे सुप्रसिद्ध अभिनेते व सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. त्याचवेळी एका व्यक्तीने त्यांना प्रश्न विचारला.
अजित पवार बोलत असताना काय घडलं?
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांचा प्रश्न : शहरातील नदी लगतची, दुर्गा देवी टेकडी वरची वृक्षतोड होणार आहे, आपण पालकमंत्री म्हणून ही वृक्षतोड थांबवावी अशी अपेक्षा आहे.
अजित पवारांचे उत्तर : हे सगळं ऐकल्यावर कुठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो, असं मला वाटायला लागलं आहे. जो तो उठतो आणि मला उपदेश देतो. सगळा मक्ता मीचं घेतलाय, ह्यांनी फक्त उपदेश द्यायचे. ठीक आहे, धन्यवाद...
मारुती भापकर यांच्या प्रश्नाल असं उत्तर देत अजित पवारांनी हात जोडले.
तुला अक्कल, आम्ही बिनडोक...
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शुक्रवारी (८ ऑगस्ट) सकाळी चाकणच्या तळेगाव आणि आंबेठाण चौकात भेट देऊन वाहतूक कोंडीच्या समस्येची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळीही त्यांना एका व्यक्तीने त्यांच्यासमोर मुद्दा मांडला. "अजितदादा आम्ही पाच वेळा आंदोलन केली आहेत. आमचे जीव जात आहेत", असे ती व्यक्ती म्हणाली.
त्यावेळी अजित पवार म्हणाले, "तुलाच अक्कल आहे का, आम्ही बिनडोक आहोत का, आम्हीसुद्धा आठ वेळा निवडून आलो आहोत. या शहाण्याला काही कळत नाही. आम्ही आलो नसतो तर काय झालं असतं. सकाळी साडेचारला उठून आम्ही कामं केली आहेत. या परिसराच्या विकासासाठी तीनशे, चारशे कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. जर आम्ही अतिक्रमणे काढली तर पुन्हा तुमची नाराजी सोसावी लागते", अशा शब्दात अजित पवारांनी त्याला सुनावलं.