शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

घरातले अन्न, RO फिल्टरचे पाणी तरीही GBS ने गाठलं! मृताच्या कुटुंबियांकडून अनेक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:41 IST

GBS Outbreak: औषध घेतल्यानंतर प्रकृती थोडी सुधारली आणि ११ जानेवारीला ते कुटुंबासह सोलापूरला रवाना झाले. 

पुणे -  पुणे - पुणे शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम या नव्या विषाणूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसली आहे. या विषाणूचे आतापर्यंत १११ संशयित रुग्ण शहरात आढळले आहेत. या रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ०५ रुग्ण, पुणे महापालिका हद्दीत ८६, तर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १२ तसेच इतर जिल्ह्यातील ८ रुग्ण असे एकू्न १११ रुग्णांवर सध्या पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. १११ रुग्णांमध्ये ७७ पुरुष रुग्ण तर ३४ महिला रुग्ण असून यापैकी १३ रुग्ण हे अतिदक्षता (व्हेंटीलेटर) विभागात आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.दरम्यान, पुण्यातील धायरी परिसरातील 40 वर्षीय व्यक्तीला या आजाराची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रवीण कल्लप्पा विभुते (वय ४०, रा. हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर) असे मृताचे नाव आहे. ते पुण्यात चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूमुळे घरातील सर्वांचा धक्का बसला असून नेमका त्यांना हा आजार कसा झाला असा प्रश्न कुटूंबीयांकडून उपस्थित केला जात आहे.    एबीपी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, प्रवीण यांच्या भावाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. माध्यमांशी बोलतांना प्रशांत विभुते म्हणाले,'८ आणि ९ जानेवारी दरम्यान प्रविण यांना जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला. औषध घेतल्यानंतर प्रकृती थोडी सुधारली आणि ११ जानेवारीला ते कुटुंबासह सोलापूरला रवाना झाले. त्यानंतर संक्रांतीचा सण व्यवस्थित पार पडला, पण १७ जानेवारीला प्रविण यांना अन्न गिळताना त्रास होऊ लागला. त्यांच्या पायांत जडपणा जाणवू लागल्याने त्यांच्या पत्नीने त्यांना तातडीने पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडत गेली. काही दिवसांतच त्यांचे हात आणि पाय निकामी झाले. त्यानंतर त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले. तपासणीत त्यांना GBS असल्याचे निष्पन्न झाले. काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला.त्यांनी या दरम्यान घरीच बनवलेले अन्न खाल्ले असून घरातील स्वच्छ पाणी पिले होते. त्यांनी कधीच शिळे अन्न खाल्ले नव्हते. त्यांना हा आजार नेमका झाला कसा असा प्रश्न सध्या आमच्या मनात आहे.असेही प्रशांत विभुते यांनी सांगितले.या रुग्णाची जीबीएस आजारावर मातनिलेश अभंग या तरुणाने जीबीएस या आजारावर ४ महिन्यांनी मात केली. त्यानंतर लोकमतने अभंग यांच्या बरोबर संपर्क साधला असता त्यांनी या आजाराची कथा सांगितली. ते म्हणाले, हा काही आता नव्यानेच सुरू झालेला आजार नाही. मला तो १९ जानेवारी २०१९ मध्ये झाला होता. त्याच दिवशी पहाटे मला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. तिथून ३० मे २०१९ रोजी मी व्हेंटिलेटरवरून बाहेर आलो. तब्बल साडेचार महिने आयसीयूमध्ये काढले. मानेपासून पायाच्या तळव्यापर्यंत सगळं शरीर पॅरालाइज झालं होतं. फुप्फुसंही पूर्णपणे कमकुवत झाली होती, म्हणूनच व्हेंटिलेटरची गरज पडली. पण आता मी पूर्णपणे ठणठणीत झालो आहे. जे पॅरालाइज झालं होतं, ते फिजिओथेरपीमुळे पूर्वीसारखं झालं आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीfoodअन्नHealthआरोग्यdoctorडॉक्टरDeathमृत्यू