शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
5
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
6
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
7
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
8
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
9
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
10
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
11
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
12
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
13
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
14
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
15
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
16
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
17
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
18
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
19
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
20
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

Video: सराईत गुन्हेगाराकडून हॉटेलची तोडफोड; पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 15:14 IST

एमपीडीए कायद्यांतर्गत शिक्षा भोगून आलेल्या एका सराईत गुन्हेगाराने हॉटेलची तोडफोड करीत आजुबाजुच्या व्यावसायिकांनाही धमकावले

धायरी : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथे एमपीडीए कायद्यांतर्गत शिक्षा भोगून आलेल्या एका सराईत गुन्हेगाराने हॉटेलची तोडफोड करीत आजुबाजुच्या व्यावसायिकांनाही धमकावले आहे. हि घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.  तुषार उर्फ सोन्या कोळप्पा धोत्रे (वय:२३ वर्षे, रा. जयप्रकाश नारायण नगर, नांदेड, पुणे) असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की,सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथील साईबा चहा येथे रात्री आठ वाजण्याच्या सोन्या धोत्रे हा दारू पिऊन आला. त्यानंतर त्याने तिथे असलेल्या कर्मचाऱ्याला विनाकारण मारहाण करीत हॉटेलची तोडफोड केली. दरम्यान आजूबाजूच्या व्यावसायिकांना देखील त्याने धमकावले. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोन्या धोत्रे हा सराईत गुन्हेगार असून त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे समजते. तो मागील महिन्यातच तुरूंगातून बाहेर आला असल्याची माहिती मिळते आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सध्या तो फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली. 

विनाकारण घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण....

विनाकारण एखाद्याला मारहाण करायची अथवा दुकानांतील सामानांची तोडफोड करून दहशत पसरवायची म्हणजे कमी कालावधीत 'भाई ' बनण्याचा हा मार्ग बरेच तरुण करताना दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना मात्र ह्या गोष्टीचा विनाकारण त्रास होत आहे. किरकटवाडी येथील घडलेली घटना ही अशाच प्रकारची असल्याचे समजते. या भागातील नागरिक हे भीतीच्या छायेत असून सोन्या धोत्रे याच्याविरुद्ध येथील नागरिक तक्रार करण्यास पुढेही येत नाहीत. वर्चस्व दाखविण्याच्या उद्देशाने गाड्यांची अथवा दुकानांतील सामानांची तोडफोड करण्याचे प्रकार वाढले आहेत. छोट्या गोष्टींना पाठबळ मिळाले की आत्मविश्‍वास आणि धैर्य वाढते व त्यातून 'गुंड' बनण्याकडे वाटचाल सुरु होते. आणि मग गुन्हे घडतात, पोलिसांनी वेळीच अशा 'भाई' होऊ पाहणाऱ्या तरुणांना आवर घालणे गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक