हॉटेलच्या मॅनेजरनेच हाॅटेलमधून केली तब्बल ७७ हजारांची रक्कम लंपास, आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 07:08 PM2021-05-05T19:08:27+5:302021-05-05T19:11:33+5:30

रिशेप्शन काऊंटरचे लाॅक तोडून केला हा प्रकार

Hotel manager pays Rs 77,000 from hotel, burglar remanded in police custody for two days | हॉटेलच्या मॅनेजरनेच हाॅटेलमधून केली तब्बल ७७ हजारांची रक्कम लंपास, आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

हॉटेलच्या मॅनेजरनेच हाॅटेलमधून केली तब्बल ७७ हजारांची रक्कम लंपास, आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देइंदापूर पोलिसांनी आरोपीचे मूळ ठिकाण उत्तराखंड येथून घेतले ताब्यात

बाभुळगाव: इंदापूर तालुक्यात सरडेवाडी येथील हाॅटेल स्वामिराज फ्युअर व्हेज या हॉटेलच्या रिशेप्शन कांऊटरमधून तब्बल ७७ हजारांची रक्कम चोरीला गेल्याची घटना ४ एप्रिलला पहाटे घडली. या घटनेतील फरार आरोपीला त्याचे मुळ गाव उत्तराखंड राज्यातून अटक करून इंदापूर न्यायालयात हजर केले. त्यानंतर असता आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहीती इंदापूर पोलिसांनी दिली आहे.

याबाबत संदिप चित्तरंजन पाटील (रा.इंदापूर) यांनी इंदापूर पोलिसात फीर्याद दिली आहे .तर इश्वरसिंग भोपालसिंग सरोगी (रा. उत्तराखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हाॅटेल स्वामीराज येथे मॅनेजर म्हणून कामाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हाॅटेलमधील रिशेप्शन काऊंटरचे लाॅक तोडून हाॅटेलच्या दोन दिवसाची व्यवसाय रक्कम २७ हजार ३६० रूपये व लग्न अँडवान्सचे ५० हजार रोख अशी एकूण ७७ हजार ३६० रूपये रक्कम चोरी करून ४ एप्रिलला पहाटे ४:३० च्या सुमारास फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सदर घटनेचा तपास इंदापूर प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहम्मद अलीभाई मड्डी व पोलीस शिपाई अरिफ सय्यद यांनी करून आरोपीला उत्तराखंड राज्यातील त्याच्या मुळ गावी कपकोत येथून शिताफीने अटक करून इंदापूर पोलीस ठाण्यात हजर केले. 

Web Title: Hotel manager pays Rs 77,000 from hotel, burglar remanded in police custody for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.