Hotel breaken due to touch in the kharadi | धक्का लागल्याने हॉटेलमध्ये शिरून टोळक्याची तोडफोड ; खराडीतील घटना

धक्का लागल्याने हॉटेलमध्ये शिरून टोळक्याची तोडफोड ; खराडीतील घटना

ठळक मुद्देयाप्रकरणी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद

पुणे : वाहनावरून जाताना हाताला धक्का लागल्याच्या कारणावरून हॉटेलमध्ये शिरून तेथील खुर्च्या-टेबलांची मोडतोड करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्याचा प्रकार खराडीत घडला. याप्रकरणी चंदननगरपोलिसांनी चौघांना अटक केली आहे. 
प्रतीक गजानन चव्हाण (वय २३, रा़ गणपती सोसायटी, चंदननगर), अक्षय एकनाथ कावेर (वय २१, रा. गजानन कृपा, चंदननगर), रोहित मिलिंद खैरे (वय ३०, रा. गणपती सोसायटी, तुकारामनगर, चंदननगर) आणि मनोज अभिमान कानडे (वय २०, रा. लक्ष्मीनिवास, चंदननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना खराडी येथील कॉफी केटीएम हॉटेलमध्ये १२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. 
याप्रकरणी अर्पित राऊत (वय ३१, रा़ खराडी) यांनी चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. राऊत हे खराडीतील झेन्सार आयटी पार्क येथून जात असताना दुचाकीवरून तिघे जात होते. त्यांना दुचाकीवरील या तरुणांचा हाताला धक्का लागला. तेव्हा त्यांनी गाडी नीट चालवत जा, असे सांगितले. त्यांनी राऊत यांना शिवीगाळ केली.त्यानंतर ते त्यांचा मित्र गयबिये याच्यासोबत ते कॉफी केटीएस हॉटेलमध्ये चहा पीत बसले होते. त्यावेळी ते टोळके आले़ त्यांनी राऊत यांना शिवीगाळ केली. हॉटेलमधील खुर्च्या, टेबल व इतर वस्तूंने राऊत यांना जबर मारहाण केली. त्यात त्यांच्या डोक्याला मागील बाजूला, हाताला खांद्याला व पायाला मारून जखमी केले. त्यांच्या मित्रालाही मारहाण करुन जखमी केले़ हॉटेलमधील सामानाची तोडफोड करून नुकसान केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hotel breaken due to touch in the kharadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.