शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

अंधश्रद्धेचा कहर : साडेचार महिन्यांच्या मुलीच्या तोंडात फिरवला मासा आणि घडला अनर्थ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 4:07 PM

तोंडात मासा फिरवला की लाळ गाळणे बंद होते ही अंधश्रद्धा खेड्यापाड्यांमध्ये आजदेखील जोपासली जाते. या समजुतीतूनच बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गावात अनर्थ घडला.

बारामती  :  तोंडात मासा फिरवला की लाळ गाळणे बंद होते ही अंधश्रद्धा खेड्यापाड्यांमध्ये आजदेखील जोपासली जाते. या समजुतीतूनच बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गावात अनर्थ घडला. बालिका लाळ गाळत असल्याने तिच्या मावशीने या मुलीच्या तोंडात फिरविण्यासाठी मासा सोडला. दुर्दुैवाने तो मासा निसटून थेट त्या मुलीच्या श्वासमार्गात अडकला. त्यानंतर मृत्यूच्या दाढेत गेलेल्या त्या मुलीला वाचविण्यासाठी तिच्या जन्मदात्याने प्रयत्नांची पराकाष्टा केली. अखेर बारामतीच्या डॉक्टरांनी त्यांचे कौशल्य पणाला लावत हे संकट दूर केले.             मुळचे चाळीसगाव (जि. जळगाव) येथील बापू माळी यांचे कुटुंब पाटस (ता. दौंड) येथील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी आले आहेत. ते सध्या शिर्सुफळ येथे आहेत. त्यांना साडेचार महिन्यांची मुलगी आहे. तिचे नाव अनू असून ती जन्मल्यापासून लाळ गाळते. त्यामुळे त्यावर उपाय करण्यासाठी  मुलीच्या मावशीने लाळ गळणे बंद होण्यासाठी लहान मुलीला तोंडात मासा ठेवून घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मासा बुळबुळीत असल्याने थेट हातातून निसटून मुलीच्या श्वास नलिकेत अडकला. तिच्या वडिलांनी दुचाकीवर बसवून तिला दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ केली. मात्र, दुचाकीतील पेट्रोल संपले .त्यानंतर जिवाच्या आकांताने बापु माळी यांनी रस्त्यावर मदतीची याचना केली.तेथुन जाणाऱ्या  स्कुलबस चालकाने त्यांना बारामतीत आणले.               तोपर्यंत काही कालावधीत मुलीचा श्वास बंद होत, हृदय बंद पडण्याची क्रिया सुरू झाली होती. यावेळी डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त करत जीवन संजीवनी क्रिया करून बंद पडलेला श्वासासह तसेच हृदय पूर्ववत सुरू केले. तसेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून तीस मिलिमीटर मिलीमीटर लांबीचा  गिळलेला मासा बाहेर काढला. डॉ राजेंद्र मुथा, डॉ सौरभ मुथा, भूलतज्ज्ञ अमरसिंह पवार, डॉ. वैभव मदने यांनी तिच्यावर उपचार केले. 

टॅग्स :BaramatiबारामतीFishermanमच्छीमारSocialसामाजिक