येरवड्यात गुंडांनी कोयते उगारून फोडली १२ वाहने, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 09:51 IST2024-02-28T09:50:07+5:302024-02-28T09:51:01+5:30

रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारी, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची तोडफोड करून पसार झाले...

Hooligans smashed 12 vehicles in Yerwada, case registered against two | येरवड्यात गुंडांनी कोयते उगारून फोडली १२ वाहने, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

येरवड्यात गुंडांनी कोयते उगारून फोडली १२ वाहने, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे :येरवडा भागात गुंडांनी कोयते उगारून १२ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संतोष गोपाल चव्हाण (वय ४२, रा. रामनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रामनगर परिसरात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दोघे जण आले. त्यांच्याकडे कोयता आणि हाॅकी स्टीक होती. परिसरातील नागरिकांना शिवीगाळ केली. रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारी, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची तोडफोड करून पसार झाले. वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, गुन्हे निरीक्षक आशालता खापरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. येरवडा भागात महिन्याभरापूर्वी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती.

Web Title: Hooligans smashed 12 vehicles in Yerwada, case registered against two