शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भोर नगरपालिकेचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 1:35 PM

स्वच्छ, सुंदर अभियानात शहरातील नागरिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असल्यामुळे नगरपालिकेला देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणात दुसऱ्यांदा सन्मान मिळाला आहे...

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण २०१८-१९ :  ‘नावीन्यपूर्ण उपक्रमा’तून राज्यात ७वा, तर देशात ९वा क्रमांक 

भोर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ व २०१९ या स्पर्धेत भोर नगरपालिकेने सहभागी होऊन केंद्र शासनाच्या विविध निकषांची पूर्तता करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा निर्मला आवारे व मुख्याधिकारी संतोष वारुळे यांचा गौरव करण्यात आला.पुरस्कार वितरण सोहळा जमशेद भाभा थिएटर नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स नरिमन पॉइंट, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या वेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मुख्याधिकारी संतोष वारुळेनगराध्यक्षा निर्मला आवारे, माजी नगराध्यक्षा तृप्ती किरवे, उपनगराध्यक्ष गणेश पवार, तानाजी तारू,संजीव सोनवणे, दिलीप भारांबे, लाला गायकवाड हे उपस्थित होते. केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने दर वर्षी सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार केंद्र शासनाने केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८च्या सर्वेक्षणात पश्चिम विभागातील नॉन अमृत प्रवर्गात भोर शहराचा गुणानुक्रम ७वा, तर स्वच्छ सर्वेक्षण २०१९च्या सर्वेक्षणात नॉन अमृत प्रवर्गात राष्ट्रीय पातळीवर भोर शहराचा गुणानुक्रम ३४वा आहे. शहराच्या स्वच्छतेच्या व पर्यायाने स्वच्छ सर्वेक्षणात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल शासन निर्णय नगरविकास विभाग अभियान संचालनालयामार्फत स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन भोर नगरपालिकेचा गौरव करण्यात आला.देशपातळीवर पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान मध्य प्रदेश या राज्यांतून देशपातळीवरील मागील वर्षी केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेत ४,२०३ नगरपालिकांमधून भोर नगरपालिकेला ‘नावीन्यपूर्ण उपक्रम’ या वर्गातून राज्यात ७वा, तर देशात ९वा क्रमांक मिळला होता. या वर्षीही देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणात दुसऱ्यांदा, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने तिसऱ्यांदा सन्मान भोर नगरपालिकेने मिळवून संस्थानकालीन भोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यामुळे शहरवासीयांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.भोर नगरपालिकेला मिळालेला हा बहुमान आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी, सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्था, बँका, शाळा, महाविद्यालये, मेडिकल, बार आसोसिएशन, व्यापारी वर्ग, गृहनिर्माण संस्था आणि पत्रकारांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे मिळाला असल्याचे नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी सांगितले. पुढील काळातही नगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून भोर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची परंपरा कायम राहील. स्वच्छ, सुंदर अभियानात शहरातील नागरिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असल्यामुळे नगरपालिकेला देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणात दुसऱ्यांदा सन्मान मिळाला आहे. यापुढील काळातही भोर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी सांगितले. चौकट- स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात भोर नगरपालिकेचा देशपातळीवर सलग तिसऱ्यांदा गौरव भोर नगरपालिकेने सन २०१८मध्ये देशपातळीवरील ४,२०३ नगरपालिकांमधून स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात ७वा, तर देशात ९वा क्रमांक मिळविला होता. तर, २०१९ या वर्षातही स्वच्छ सर्वेक्षणात भोर नगरपालिकेला राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली येथे पुरस्कार मिळाला होता. आत्ता महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुरस्कार दिल्याने सलग तिसºयांदा भोर नगरपलिकेचा गौरव करण्यात आला आहे. भोर नगरपलिके ला राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांंमधून भरीव निधी आणून देण्यासाठी मदत करून नगरपालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचारी, नगराध्यक्ष व पदाधिकारी यांनी कचरामुक्त व हगणदरीमुक्त शहर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान