दिल्लीत गंभीर परिस्थिती असताना गृहमंत्री झारखंड प्रचारात हे दुर्दैव : सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 15:06 IST2019-12-16T15:06:30+5:302019-12-16T15:06:45+5:30
नागरिकत्व विधेयकाच्या दुरुस्तीवरून दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीत गंभीर परिस्थिती असताना गृहमंत्री झारखंड प्रचारात हे दुर्दैव : सुप्रिया सुळे
पुणे : नागरिकत्व विधेयकाच्या दुरुस्तीवरून दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात एवढे गंभीर प्रश्न असताना दिल्लीचे पोलीस प्रशासन ज्यांच्या अखत्यारीत काम करते ये गृहमंत्री झारखंड प्रचारात व्यस्त आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. इतकेच नव्हे तर . हे सरकार केंद्रातले निवडणूक ते निवडणूक आणि फक्त प्रचारात व्यस्त असते. त्यांना प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेचं सुख-दुःख यांच्यासाठी वेळ नसतो असेही त्या म्हणाल्या.
पुण्यात सिंचन भवनात झालेल्या बैठकीनंतर सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, अतिशय भयानक परिस्थिती आहे. दिल्लीचे पोलीस हे केंद्र सरकारचे असतात.हे गृह मंत्रालयाचे अजून एक अपयश आहे. इथे भारतात इतके प्रश्न गंभीर असताना, दिल्लीत बस जळत असताना पण देशाचे जबाबदार व्यक्तिमत्व आणि गृहमंत्री हे झारखंडच्या प्रचारात आहेत , हे दुर्दैव आहे. हे सरकार केंद्रातले निवडणूक ते निवडणूक आणि फक्त प्रचारात व्यस्त असते. त्यांना प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेचं सुख-दुःख यांच्यासाठी वेळ नसते. या सगळ्या झालेल्या गोष्टीचा निषेध करते. पहिला हिंसाचार थांबला पाहिजे, दिल्लीत होत आहे. ज्या भागात आंदोलन केल्यावर लाठीचार्ज होत असेल आणि कॉलेजमध्ये घुसून होत असतील तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि देशासाठी घातक आहे.