शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घर बसल्या विद्यार्थ्यांना शाळेत घेता येणार प्रवेश; जिल्हा परिषदेतर्फे ऑनलाईन व्यवस्था 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 17:44 IST

कोरोनामुळे शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश कसा द्यायचा असा प्रश्न पालकांना पडला होता..

ठळक मुद्दे पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीरजिल्हा परिषदेने यावर तोडगा काढला असून ऑनलाईन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणारजिल्ह्यात जवळपास १ हजार ७४३ खासगी शाळा

पुणे : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये बंद करण्यात आले आहे. संचारबंदीचा कालावधी वाढवण्यात आल्याने येत्या शैक्षणिक वर्षात पाल्याला शाळेत प्रवेश कसा द्यायचा असा प्रश्न पालकांना पडला होता. जिल्हा परिषदेने यावर तोडगा काढला असून cनलाईन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी तालुकानिहाय गुगल लिंक तयार करण्यात आली असून यामुळे घरी बसूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेता येणार आहे.कोरोनाचे रूग्ण आढळल्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली असून सर्व शाळा महाविद्यालये बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संचारबंदी ३ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे २०२० -२१ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश कसा द्यायचा असा प्रश्न पालकांना पडला होता. यासोबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागापुढेही हा प्रश्न होता. दर वर्षी शाळा बंद होण्याआधी दखलपात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण शिक्षकांना प्रत्यक्ष घरी जाऊन करावे लागत होते. मात्र, संचारबंदीमुळे ते शक्य नाही. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने  या वर्षी पूर्ण जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी तालुका निहाय गुगल लिंक तयार करण्यात आली आहे. ही प्रत्येक तालुक्यात पाठविण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करून पालकांना आपल्या परिसरातील शाळा निवडता येणार आहे. जसा पालकांचा प्रतिसाद मिळेल तसा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या बाबतची माहिती जिल्ह्यातील ३ हजार ६५१ शाळांना आणि शिक्षकांना देण्याच्या सुचना शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे यांनी केली आहे. 

खासगी शाळांनाही नलाईल प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सुचनाजिल्ह्यात जवळपास १ हजार ७४३ खासगी शाळा आहेत. या शाळांनाही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. शाळांनी त्यांच्या स्वतंत्र लिंक तयार करून ही प्रक्रिया सुरू करावी. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि पालकांना शाळेत न बोलवता प्रवेश द्यावा अशा सुचना शिक्षणाधिकारी सुनिल कुऱ्हाडे यांनी केल्या आहेत......................शाळांची कामेही ऑनलाईनलॉकडाऊनच्या काळात अनेक शाळा बंद करण्यात आल्या. या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून व्हॉट्सपच्या माध्यमातून तर काही शाळांनी थेट ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचा घरी बसूनच अभ्यासक्रम  घेतला.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसonlineऑनलाइनStudentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळा